पुणे: …तर कारखान्यांची धुराडी पेटू देणार नाही

अन्यथा मंत्र्यांच्या घरावर जप्ती आणावी लागेल
सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या कारखान्यांकडे तब्बल 60 कोटी थकीत रक्कम आहे; आणि त्यांच्याच हातात तिजोरीच्या चाव्या दिल्या असल्याचा घणाघात खासदार शेट्टी यांनी केला. त्यामुळे येत्या 21 जुलैपर्यंत थकीत रक्कम देण्यात यावी, अन्यथा मंत्र्यांच्या घरावर जप्ती आणावी लागेल असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. गेल्यावर्षी उस तोडणी व वाहतुकीच्या दरात घोळ केला आहे. उस दर नियंत्रण समितीने घेतलेल्या निर्णयात कोणताही बदल करू नये. काही साखर कारखाण्यांच्या संचालकांनी गरीबांचा उस कमी दराने खरेदी केला आणि तोच उस पाहुण्यांच्या नावाने कारखान्यांना जादा दराने दिल्याचा आरोप शेट्टी यांनी केला.

खासदार राजू शेट्टी यांचा इशारा : स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे आंदोलन
थकीत एफआरपी रक्कम, गायीच्या दुधाला प्रतिलिटर पाच रुपये अनुदान देण्याची मागणी

पुणे – शेतकऱ्यांच्या उसाची थकीत एफआरपीची रक्कम त्वरीत देण्यात यावी आणि गायीच्या दुधाला प्रतिलिटर पाच रुपये अनुदान थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा व्हावे, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने शुक्रवारी आंदोलन करण्यात आले. येत्या 21 जुलैपर्यंत थकीत एफआरपीची रक्कम मिळाली नाही तर राज्यातील एकही साखर कारखान्याची धुराडी पेटू देणार नाही, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी दिला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजु शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली साखर आयुक्त कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. यावेळी रविकांत तुपकर, प्रकाश पोफळे, राजेंद्र ढवाण पाटील, भगवान काटे, सुरेश पाटील, प्रकाश भोईटे, सावकार मादनाईक, जालींदर पाटील, रसिका ढगे यासह हजारोंच्या संख्येने शेतकरी सहभागी झाले होते. राज्यभरातील ऊस उत्पादक शेतकरीही मोठ्या संख्येने उपस्थित होते. अलका चौकातून मोर्चाला सुरवात झालेल्या मोर्चा साखर आयुक्त कार्यालयावर जावून धडकला. त्याठिकाणी शेट्टी यांनी मोर्चाला संबोधीत केले. शेतकऱ्यांना फसविणाऱ्या मंत्र्यांना ठोकायलाही मागेपुढे पाहणार नाही, असा सज्जड इशारा यावेळी शेट्टी यांनी सरकारला दिला.

ते पुढे म्हणाले, ही बळीराजाची फौज आहे, उन्ह, पाऊस याला घाबरुन पळणारी औलाद नाही. कुणी लुटले, कुणी फसवले हे सांगायला आलो आहोत. हा ट्रेलर आहे “पिश्‍चर अभी बाकी हे’. आम्ही संयम ठेवला आहे, यापूढे शेतकऱ्यांची लुट होवू देणार नाही. साखर आयुक्तालयाकडील 15 जून अखेरच्या अहवालानुसार शेतकऱ्यांच्या ऊसाची रास्त आणि किफायतशीर किंमत तथा एफआरपीची थकित रक्कम सुमारे पंधराशे कोटी रुपये आहे. ही थकित एफआरपीची रक्कम त्वरीत न दिल्यास साखर आयुक्तांनी कारखान्यांवर महसूल वसुली प्रमाणपत्रानुसार (आरआरसी) जप्तीची कारवाई करून साखरेची रक्कम वसूल करून द्यावी, अशी मागणी खासदार राजू शेट्टी यांनी यापुर्वीच केलेली आहे; तर राज्य सरकारने गाईच्या दुधाचा खरेदी दर लिटरला 27 रुपये घोषित केलेला असला तरी सहकारी आणि खासगी दूध व्यावसायिकांकडून होणारी खरेदी सध्या 17 रुपये लिटरपर्यंत खाली आलेली आहे. त्यामुळे थेट अनुदान देण्याची मागणी संघटनेने केली आहे. दुग्ध आयुक्त कार्यालयातून मागण्यांचे निवेदन घेण्यासाठी अधिकारी उपस्थित राहणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)