पुणे – …तर, आपला बळी पडण्याची शक्‍यता

ज्येष्ठ दिग्दर्शक अमोल पालेकर : महाराष्ट्र फाउंडेशनतर्फे मान्यवरांना पुरस्कार प्रदान

पुणे – आज ज्यांना पुरस्कार मिळाले, त्या पुरस्कारर्थींचा माझी वाटचाल प्रगल्भ होण्यामध्ये मोठा वाटा आहे. मी यांचा चाहता असल्याने हा पुरस्कार देताना आनंद वाटतो. असे पुरस्कार देताना आणि घेताना जबाबदारी वाढते. याचवेळी सभोवतालच्या परिस्थितीचे भान असणे आवश्‍यक आहे. अन्यथा, जशी रात्र असते त्याप्रमाणे दडपशाही वाढत जाते. आपल्याला हवेतल्या बदलाची चाहूल असणे गरजेचे आहे. नाहीतर, आपला याचे बळी पडण्याची शक्‍यता असते, असे मत ज्येष्ठ दिग्दर्शक आणि अभिनेते अमोल पालेकर यांनी व्यक्त केले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

महाराष्ट्र फाउंडेशनतर्फे दिल्या जाणाऱ्या पुरस्कार वितरण सोहळ्यामध्ये ते बोलत होते. महाराष्ट्र फाउंडेशनच्या वतीने यंदाचा साहित्यिक क्षेत्रातील योगदानासाठी दिला जाणारा “साहित्य जीवनगौरव’ पुरस्कार ज्येष्ठ लेखिका शांता गोखले यांना देण्यात आला. तर, समाजकार्यासाठी वरोरा येथील “आनंदवन’ संस्थेला “समाजकार्य जीवनगौरव’ पुरस्कार देण्यात आला. 2 लाख आणि स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

या बरोबरच “कथा वाङ्‌मय पुरस्कार’ सानिया यांना, तर “प्रबोधन पुरस्कार’ हरी नरके यांना दिला. 1 लाख रुपये आणि स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे. “ललित ग्रंथ पुरस्कार’ प्रवीण बांदेकर यांना, तर “रा. शं. दातार नाट्य पुरस्कार’ राजीव नाईक यांना देण्यात आला. कार्यकर्ता पुरस्काराने निशा शिवूरकर आणि मतीन भोसले यांना सन्मानित केले. 50 हजार रुपये आणि स्मृतिचिन्ह, असे पुरस्काराचे स्वरूप आहे.

“अनुवाद हा विषय कोणाच्याही बोलण्यात आणि ध्यानात नसतो. मी स्वतःला अनुवादक समजते. अनुवादक करताना मी लेखनाचे संपूर्ण कसब पणाला लावले. भाषांच्या सर्व शक्‍यता पणाला लावते. साहित्याचे अनुवादन करताना साहित्य कृतीचा आवाज आणि बाज तोच ठेवून त्याला इंग्रजीत बोलत करण्याचे काम मी करते. अनुवादाबद्दल जसे वाचक उदासीन असतात तसे लेखकही उदासीन असतात. त्यामुळे अनुवाद जमला की माझी पाठ थोपटून घेते, असे शांता गोखले म्हणाल्या.

पदपथावर दुकाने नको, डाव्या बाजुने चाला असे अनेक कायदे आपल्याकडे आहेत. आपल्याला हेल्मेट घालणे चूक वाटते. पण आपण किती कायदे पाळतो? समाज कायद्याने नव्हे तर विचाराने बदलतो, असे डॉ. विकास आमटे म्हणाले. पुरस्कार घेताना आनंदाची की दुःखाची बाब आहे हेच काही वेळा समजत नाही. त्यामुळे मी “व्यक्ती’ करता मिळालेला नाही तर “संस्थे’करता मिळालेले पुरस्कार स्वीकारला. आनंदवन आता प्रेक्षणीय स्थळ म्हणतात पण ती ओळख मला नको. जाणीवपूर्वक टाळ्या नको तर सहभाग हवा, असे डॉ. आमटे यावेळी म्हणाले. यावेळी सर्व पुरस्कारार्थींनी मनोगत व्यक्त केले. डॉ. हमीद दाभोळकर यांनी आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)