पुणे: डुक्कर खिंडीत जबरी चोरी करणाऱ्यांना अटक

पुणे – डुक्कर खिंडीत जबरी चोरी करणाऱ्यांना कोथरुड पोलिसांनी अटक केली आहे. त्यांनी काही दिवसांपूर्वी एका बॅंकेच्या प्रबंधकाला तसेच महिलेला लुटले होते.

लक्ष्मण येडबा शेंडगे (18, रा. वारजे), शुभम उर्फ भावड्या नागेश तिसरबुडे (22, रा. वारजे), अनिकेत राजु देशपांडे (18, रा. वारजे) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत,ेतर यात एका अल्पवयीन मुलाचाही समावेश आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

कोथरुड पोलीस ठाण्याच्या हद्दीत डुक्कर खिंडीजवळ बॅंक प्रबंधक असलेल्या अलोक सोपान अभंग यांना चार अनोळखी व्यक्तींनी 20 जून रोजी दगडाने मारहाण करून मोबाईल व रोख रक्कम लुटली होती. यानंतर 22 जून रोजी सकाळी मॉर्निंग वॉकला गेलेल्या रिता गणेश खैरनार (33) या महिलेचे मंगळसूत्र जबरदस्तीने चोरुन नेले होते. लागोपाठ एकाच वेळी घडलेल्या या घटनांमुळे परिसरात खळबळ माजली होती. पोलिसांनी तपास करून चौघांनाही अटक केली आहे. ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक अप्पासाहेब शेवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)