पुणे – ‘डीटीई’ मार्फेतच पदविका अभ्यासक्रमांचे प्रवेश

पुणे – राज्यातील पदविका अभ्यासक्रमाचे प्रवेश तंत्रशिक्षण संचालनालयामार्फत(डीटीई) होणार असल्याच्या निर्णयावर आता शिक्‍कामोर्तब झाले आहे. राज्य शासनाने पदविका अभ्यासक्रम प्रवेश प्रक्रियेसाठी तंत्रशिक्षण संचालकांना सक्षम प्राधिकारी म्हणून जाहीर केले आहे. त्यामुळे राज्य सीईटी सेलऐवजी आता तंत्रशिक्षण संचालनालयामार्फत येत्या शैक्षणिक वर्षापासून पदविका अभ्यासक्रमाचे प्रवेश होणार असल्याचे स्पष्ट होत आहे.

महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष (राज्य सीईटी सेल) यांच्यामार्फत गतवर्षी सर्व पदविका अभ्यासक्रमाचे प्रवेशप्रक्रिया राबविण्यात आली होती. सीईटी सेल अंतर्गत ऑनलाइन अर्ज करताना पदविका अभ्यासक्रमास प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना जात पडताळणी प्रमाणपत्र अनिवार्य केले होते. मुळात पदविका अभ्यासक्रम जात पडताळणी प्रमाणपत्र घेतले जात नाही. फक्‍त जातीच्या दाखल्यावर प्रवेशप्रक्रिया होत असते. यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतल्यानंतर, न्यायालयाच्या निर्णयानंतर पदविका प्रवेशाची जबाबदारी तंत्रशिक्षणावर सोपविण्यात आली आहे. त्यामुळे आता पदविका अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना जात पडताळणी प्रमाणपत्र अनिवार्य राहणार नाही.

अभियांत्रिकी व तंत्रज्ञान पदविका, औषधनिर्माणशास्त्र पदविका, हॉटेल व्यवस्थापन व खाद्यपेय व्यवस्था तंत्रज्ञान पदविका या पदविका अभ्यासक्रमांचा प्रवेश आता “डीटीई’द्वारे होणार आहेत. या प्रवेशप्रक्रियेबाबत सर्व निर्णय घेण्याचे अधिकार तंत्रशिक्षण संचालकांना राहणार आहेत. त्यासाठी डीटीईला प्रवेशासाठी ऑनलाइन संगणकीय प्रणाली विकसित करावी लागणार आहे. त्यानुसार प्रवेशप्रक्रियेची कार्यवाही करण्याच्या सूचना राज्य शासनाने दिल्या आहेत.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)