पुणे – डिजिलॉकरला अजूनही कुलूपच

गणेश राख

पुणे – आधार-पॅन कार्ड, लायसन्स, बॅंक पासबूक, गुणपत्रिका, रहिवासी प्रमाणपत्र महत्त्वाची कागदपत्रे सांभाळताना आपली तारांबळ उडते. ही कागदपत्रे अनेकदा सोबत घेऊनच फिरण्याची वेळ येते. यावर केंद्र सरकारने डिजिटल इंडिया मोहिमेअंतर्गत “डिजिटल लॉकर’ अर्थात डिजिलॉकरचा पर्याय उपलब्ध करून दिला आहे. पण, अजूनही शासकीय यंत्रणा या पर्यायापासून दूर आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

शासनाच्या परिपत्रकानुसार, यातील सर्व कागदपत्रे अधिकृत समजली जाणार असून सरकारच्या विविध खात्याला ती ग्राह्य धरावी लागणार आहेत. मात्र, शासकीय कार्यालये, वाहतूक पोलिसांची उदासीनता, तसेच नागरिकांमध्ये पुरेशी जागरूकता नसल्याने त्याचा वापर होताना दिसत नाही.
केंद्र शासनाने अनेक वेळखाऊ सेवा बाद करत इ-गव्हर्नन्सकडे वाटचाल करण्याचे ठरविले आहे. यासाठी शासन नवनवीन योजना राबवत आहे. याच उद्देशाने एक पाऊल पुढे टाकत सर्वांसाठी शासनाने जवळपास दोन वर्षांपूर्वी डिजिटल लॉकर योजना सुरू केली. यासाठी सर्व सामान्य व्यक्तीला आपल्या मोबाइलवरून फक्त हे अँप डाउनलोड करून यावर खाते उघडावे लागणार आहे. यातील गैरप्रकार टाळता यावे यासाठी शासनाने डिजिलॉकर ही सुविधा आधार कार्डशी संलग्न केली आहे. नागरिकांना आधार क्रमांकाचा वापर करून सुविधेचा लाभ घेता येणार आहे.

यातच एक पाऊल पुढे टाकत पुण्याच्या प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (आरटीओ) 2006 पासूनचे लायसन्स, आरसी बुक डिजिलॉकरमध्ये उपलब्ध करुन दिली आहेत. यामुळे नागरिकांना ती फायदेशीर ठरत आहेत. मात्र, शासनाच्या काही खात्यांमधून याला हरताळ फसला जात असून त्यांना याबाबत अजून पुरेशी माहितीच नाही. यामुळे अनेक जण याला गांभीर्याने घेत नसल्याचे दिसून येते. उदाहरण द्यायचे झाल्यास , वाहन अडविल्यास डिजिलॉकरमधील कागदपत्रे पोलिसांना दाखवणे अधिकृत आहे. मात्र, यासंदर्भात वाहतूक पोलिसांना पुरेशी माहिती नाही. यामुळे वाहन चालकांनी डिजिलॉकरमधील लायसन्स, आरसी दाखविल्यानंतर पोलीस ते मान्य करीत नसल्याने वाहन चालक आणि पोलिसांत वाद होत आहेत. यामुळे नागरिकांना अडचणी येत असून प्रतिसादही कमी होत आहे. परिणामी शासनाने सुरू केलेली चांगली सुविधा दुर्लक्षित होत आहे. डिजिटल इंडिया मोहीम प्रभावीपणे राबवायची असल्यास यासारख्या योजनेला सर्वांनी मिळून प्रतिसाद देणे गरजेचे आहे.
—————-
असे उघडा खाते
मोबाइलच्या प्लेस्टोरवरून डिजिलॉकर नावाचे ऍप डाउनलोड करा. यानंतर आधार नंबर टाकून साइन अप करा. यानंतर तुम्ही आधार कार्डवेळी जो मोबाइल नंबर रजिस्टर केला आहे, त्या नंबरवर एक वन टाइम पासवर्ड (ओटीपी) येईल. यानंतर हा पिन टाकून तुम्ही स्वतःचा पासवर्ड तयार करू शकता. आहे पद्धतीने तुमचे खाते तयार होईल. यानंतर तुम्ही सर्व महत्वाची कागदपत्रे यामध्ये अपलोड करून जतन करून ठेऊ शकता.
——————–


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)