पुणे: ट्रकच्या धडकेत दुचाकीवरील महिला ठार

पुणे – भरधाव ट्रकने दुचाकीस धडक दिली. या अपघातात दुकाचीवर पाठीमागे बसलेली महिला ठार झाली आहे. हडपसर-सासवड रस्त्यावरील फुरसुंगी रेल्वे उड्डाण पुलावर बुधवारी दुपारी हा अपघात झाला. पोलिसांनी ट्रकचालकास अटक केली आहे.

गेनू विलास कांबळे (वय 35, रा. साडेसतरानळी, हडपसर) असे मृत महिलेचे नाव आहे. याप्रकरणी त्यांचे पती विलास कांबळे (वय 42) यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार ट्रकचालक सागर विलास जाधव (वय 28, रा. शिंदेवाडी, ता. पंढरपूर, जि. सोलापूर) याच्याविरोधात हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादी विलास कांबळे दुचाकीवरून बुधवारी (दि.27 जून) दुपारी साडेतीनच्या सुमारास घरी जात होते. त्यांची पत्नी गेनू या दुचाकीवर पाठीमागे बसल्या होत्या. दरम्यान, आरोपी जाधवने बेदरकारपणे ट्रक पळवून फिर्यादींच्या दुचाकीस धडक दिली. त्यामध्ये गेनू कांबळे या रस्त्यावर कोसळल्या आणि त्यांचा गंभीर जखमी होवून मृत्यू झाला. अपघातानंतर जाधव हा घटनास्थळावरून पळून गेला होता. पोलिसांनी शोध घेवून त्याला अटक केली. या प्रकरणाचा पुढील तपास उपनिरीक्षक शेंडगे करीत आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)