पुणे – टोळक्‍याकडून कोथरूड परिसरात तरुणाचा खून

पुणे – कोथरूड परिसरातील गोसावी वस्ती भागात तरुणावर कोयत्याने वार करून खून केला. तीन ते चार जणांच्या टोळक्‍याने मिळून तरुणाचा खून केल्याचे समोर आले आहे. अलंकार पोलीस ठाणे हद्दीत रात्री साडेनऊच्या सुमारास ही घटना घडली.

सिध्दाप्पा कलवंडी (वय 25) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत अलंकार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिध्दाप्पा कलवंडी हा डाहणुकर कॉलनी येथील लक्ष्मीनगर वस्तीत राहात होता. सोमवारी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास तो वस्तीत रस्त्यावर उभा असताना आलेल्या तीन ते चार जणांच्या टोळक्‍याने त्याच्यावर हल्ला केला. यात गंभीर जखमी झाल्याने त्याचा मृत्यू झाला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

या घटनेची माहिती अलंकार पोलिसांना मिळताच वरीष्ठ अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान, मुलीची छेड काढल्याच्या कारणावरून खून झाल्याचे प्रथमदर्शनी तपासातून दिसून येत आहे. गुन्हे शाखा तसेच स्थानिक पोलिसांकडून आरोपींचा माग काढण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)