पुणे -टॅक्‍सी कंपनीची फसवणूक; दोघांना पोलीस कोठडी

पुणे – बनावट पावती देऊन ग्राहकांकडून घेतलेले पैसे कंपनीला न देता 25 लाखांचा अपहार करण्यात आला. याप्रकरणी ओला कंपनीच्या सोर्सिंग एक्‍झीक्‍युटिव्हसह एकाला येरवडा पोलिसांनी अटक केली. त्यांना न्यायालयात हजर केले असताना 31 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

ब्रिजेश हरिभाऊ वाघालगावे (24, रा. धनकवडी), अमोल सोनबा पिलानी (31, रा. पिंपरी) अशी पोलीस कोठडी झालेल्यांची नावे आहेत. तर कुशांक विवेक उपाध्याय (29, रा. वडगावशेरी), रेणुका कुलकर्णी (रा. कात्रज) आणि रामदास चितळकर (रा.नगर) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत नितीन किसन गागरे (33, रा. हडपसर) यांनी फिर्याद दिली आहे. हा प्रकार मे 2017 ते 20 डिसेंबर 2017 या कालावधीत घडला. अमोल पिलानी, रेणुका कुलकर्णी, रामदास चितळकर, कुशांक उपाध्याय आणि ब्रिजेश वागलावे यांनी आपापसात संगणमत करून ग्राहकांकडून पैसे घेत त्यांना बनावट पावती दिली. तसेच ग्राहकांकडून आलेले पैसे ओला कंपनीमध्ये न भरता कंपनीची 25 लाख रुपयांची फसवणूक केली, असे गागरे यांनी दिलेल्या फिर्यादीमध्ये नमूद केले आहे. दरम्यान, गुन्ह्यातील रक्‍कम जप्त करण्यासाठी, तसेच इतर आरोपींचा शोध घेऊन बनावट पावत्यांवर सह्या कोणी केल्या? याचा शोध घेणे आहे. तसेच, आरोपींना इतर कोणी मदत केली आहे का? याचा तपास करण्यासाठी आरोपींना पोलीस कोठडी देण्याची मागणी सरकारी वकिलांनी केली. न्यायालयाने ती मंजूर केली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)