पुणे : टीपी स्कीममधील शंका दूर करू – गित्ते

पुणे – म्हाळुंगे-माण टीपी स्कीमध्ये पायाभूत सुविधांची कामे व अंतिम प्लॉट जमिनमालकांच्या नावे करण्याचे काम 15 महिन्यात पूर्ण करण्यासाठी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण कटीबध्द आहे. या टीपी स्कीमबाबत ग्रामस्थांच्या मनात काही शंका असल्यास त्याचे निरसन करण्यात येईल, अशी माहिती प्राधिकरणाचे आयुक्त किरण गित्ते यांनी दिली.

म्हाळुंगे-माण टीपी स्कीम महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम 196 मधील तरतुदीनुसार प्रसिध्द करण्यात आली आहे. ही योजना सर्व कायदेशीर बाबींचे पालन करून व सर्व ग्रामस्थांना विश्‍वासात घेऊनच तयार करण्यात आली आहे. म्हाळुंगे-माण टीपी स्कीमध्ये पायाभूत सुविधांची कामे व अंतिम प्लॉट जमिनमालकांच्या नावे करण्याचे काम 15 महिन्यात पूर्ण करण्यासाठी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण कटीबध्द आहे.

या करिता जमिनधारकांसोबत करारनामा करण्याचे ठरले आहे. नगर रचना योजनेबाबत शेतकऱ्यांसोबत बैठका घेण्यात आल्या आहेत. या योजनेची सर्वंकष माहिती, होणारे फायदे, सविस्तरपणे शेतकऱ्यांना समाजावून सांगण्यात आले आहे. तसेच सर्व शेतकऱ्यांच्या जमिनींचे हिस्से अथवा आकार याबाबत माहिती घेऊन जमिनधारकांना सर्व एफएसआय वापरता येण्याजोगा भूखंड देण्यात आलेला आहे. त्याचा समावेश करून प्रारूप टीपी स्कीम तयार करण्यात आलेली असल्याचे प्राधिकरणाचे आयुक्त गित्ते यांनी सांगितले.

शेतकऱ्यांना याविषयी काही शंका असल्यास प्राधिकरणाकडून त्यांचे निरसन करण्यात येईल. जमिनधारकांस टीपी स्कीम योजनेबाबत लेखी सूचना द्यावयाच्या असल्यास ते प्राधिकरणाकडे दाखल करू शकतात, असेही गित्ते यांनी सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)