पुणे: टगेगिरीला लगाम !

नो पार्किंगसहित विविध ठिकाणी कारवाईदरम्यान वाहनचालक आणि वाहतूक कर्मचाऱ्यांमध्ये मतभेद होतात. त्यांच्या हालचाली टिपण्यासाठी टोईंग टेम्पोवर सीसीटीव्ही बसविण्यात आले आहेत. त्यामुळे आता वाद थांबण्याची अपेक्षा आहे. त्याचबरोबर संबंधित सीसीटीव्हीचे रेकॉर्ड तपासून चुकीचे आढळल्यास संबंधितांवर कारवाई केली जाणार आहे.
– अशोक मोराळे, उपायुक्त, वाहतूक पोलीस

टगेगिरीवर “सीसीटीव्ही’ची नजर 

पुणे – नो पार्किंगमधील वाहने उचलताना अनेकदा टोईंगवाले आणि वाहनचालकांमध्ये वाद होतात. अनेकदा नो पार्किंगमध्ये नसलेले वाहनही उचलले जाते. यात अनेकदा वाहन खराब झाल्याचे आरोप केले जातात. तर टोईंग कर्मचाऱ्यांकडून वाहनचालकांवर दादागिरी केली जाते. मात्र, आता यामध्ये पारदर्शकता आणण्यासाठी टोईंग टेम्पोंवर सीसीटीव्ही बसविण्यात येत आहेत. त्यामुळे उद्धट वर्तन करणाऱ्या वाहनचालकांबरोबरच टोईंगचालकांच्या टगेगिरीलाही लगाम लागणार आहे.

काही दिवसांपूर्वी विमाननगर परिसरातून एका वाहनचालकाला दुचाकीसह टेम्पोत टाकल्याचा प्रकार घडला. यानंतर सोशल मीडियावर हा प्रकार “व्हायरल’ झाल्याने संबंधित पोलीस कर्मचाऱ्याची तत्काळ बदली झाली. तर संबंधित टेम्पाचे काम महिनाभरासाठी थांबविण्यात आले. अनेकदा अशा घटनांमध्ये वाहनचालकांचीही चूक असते. परंतु, पोलिसांना यासाठी जबाबदार धरले जाते. यामध्ये पारदर्शकता आणण्यासाठी टोईंग वाहनांमध्ये सीसीटीव्ही बसवण्याचा निर्णय वाहतूक पोलीस उपायुक्त अशोक मोराळे यांनी घेतला आहे. वाहतूक विभागाकडे एकूण पाच टोईंग टेम्पो आहेत. कारवाईमुळे एक टेम्पो बंद असून उर्वरित चार टोईंग टेम्पोवर सीसीटीव्ही बसविण्यात आले आहेत. यामुळे आता नो पार्किंगच्या ठिकाणी घडणाऱ्या घटनांचे चित्रीकरण सीसीटीव्हीच्या माध्यमातून करण्यात येत आहे. प्रत्येक टॅम्पोतील सीसीटीव्ही चित्रीकरण एका महिन्यापर्यंत जतन केले जाणार आहे. वाहनचालक आणि वाहतूक कर्मचारी यांच्यात पारदर्शीपणा ठेवण्यासाठी टोईंग टॅम्पोवर सीसीटीव्ही यंत्रणा कार्यन्वित करण्यात आली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)