पुणे – ज्येष्ठांच्या मागण्या केराच्या टोपलीत

महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघ आंदोलनाच्या पवित्र्यात

पुणे – ज्येष्ठांच्या विविध मागण्यांकरिता शासनाकडे सातत्याने मागण्यांचे निवेदन देऊनदेखील त्याला केराची टोपली दाखविली जाते. त्याकडे दुर्लक्ष केले जाते. ज्येष्ठ नागरिकांच्या योजनेकरिता 850 कोटी रुपये आपल्या तिजोरीत नसल्याचे शासन सांगते. ही लाजिरवाणी बाब असून दि.7 फेब्रुवारीला राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांसमोर लाक्षणिक उपोषण करण्यात येणार असल्याचा इशारा महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघाचे (फेस्कॉम) अध्यक्ष अरुण रोडे यांनी पत्रकार परिषदेत दिला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

रोडे म्हणाले, “गेल्या अनेक वर्षांपासून शासनाकडे राज्यातील जेष्ठ नागरिकांना एस.टी. महामंडळ बसेस आणि शिवशाहीमध्ये 60 वर्षांवरील सर्व स्त्री-पुरुषांना 50 टक्के भाडेसवलत मिळावी. श्रावण बाळ निवृत्ती वेतन व अनुदानात वाढ करावी. दारिद्रय रेषेची मर्यादा काढून निवृत्ती वेतनात वाढ करावी. ज्येष्ठ नागरिक महात्मा फुले जीवनदायी आरोग्य योजनेची व्याप्ती वाढवून ज्येष्ठ नागरिकांना तिचा लाभ द्यावा. बंद मातोश्री वृद्धाश्रमे सुरू करावीत. तालुक्‍याच्या ठिकाणी वृद्धाश्रमे आणि विरंगुळा केंद्रे सुुरू करावीत, आदी मागण्या प्रलंबित आहेत. त्याकरिता सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. यामुळे आता ज्येष्ठ नागरिकांनी शासनाला जाग आणण्यासाठी उपोषणाचा निर्णय घेतला आहे. याविरोधात पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 7 फेब्रुवारी रोजी लाक्षणिक उपोषण करणार आहे.’

पत्रकार परिषदेला महासंघाचे पुणे अध्यक्ष चंद्रकांत महामुनी, इस्कॉपचे डॉ. आर. टी. वझरकर, अॅड. बी. टी. निसळ, नामदेव डफळ, मधुकर पवार आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)