पुणे: जेसीबी चाकाखाली सापडून मुलीचा मृत्यू

जेसीबी मालक, ठेकेदाराने परस्पर मृतदेह पुरण्यास आई-वडिलांना सांगितले
दोन महिन्याने घटना उघडकीस; गुन्हा दाखल

पुणे – इमारतीच्या बांधकामाच्या ठिकाणी जेसीबीच्या मागच्या चाकाखाली सापडून दिड वर्षाच्या मुलीचा मृत्यू झाला. यात धक्कादायक बाब म्हणजे जेसीबीचा मालक व ठेकेदारांनी याची पोलिसांना माहिती न देता मुलीचा मृतदेह परस्पर पुरुण टाकण्यास आई-वडिलांना सांगितले. ही घटना 6 मार्च रोजी घडली. पोलिसांनी याची माहिती लागल्यावर चौकशी करून जेसीबी मालक, चालक आणि ठेकेदाराविरुध्द हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.
जेसीबी चालक जगन्नाथ बापुराव वाघमारे (30, रा. फुरसुगीं), जेसीबीचा मालक सागर जालिंदर दिघे (28, रा. फुरसुंगी) व ठेकेदार बालाजी विठ्ठलराव शिंदे (42, रा. खराडी) अशी आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी हडपसर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अंजुम बागवान यांनी फिर्याद दिली आहे. ही घटना 6 मार्च 2018 रोजी दुपारी फुरसुंगी येथील ग्रीन व्हाईस कन्स्ट्रक्‍शन साईटवर घडली होती. तर दिपाली धर्माजी गायकवाड (दिड वर्षे) असे मृत मुलीचे नाव आहे.

ग्रीन व्हाईस कंन्सट्रक्‍शन येथील लेबर कॅम्पजवळ जेसीबीने खोदकाम सुरू होते. यावेळी तेथील कामगार धर्माजी गायकवाड यांची दिड वर्षाची मुलगी दिपाली खेळत असताना जेसीबीच्या मागच्या चाकाखाली सापडली. यामध्ये तिचा जागीच मृत्यू झाला. घटना घडल्यानंतर याची माहिती पोलिसांना देण्यात आली नाही. जेसीबीचे मालक सागर दिघे व ठेकेदार बालाजी शिंदे यांनी मुलीच्या आई-वडिलांना परस्पर मुलीचा मृतदेह पुरण्यास सांगितले. मात्र या घटनेची माहिती काही दिवसांतच पोलिसांना मिळाली. या प्रकरणानंतर मुलीच्या आई-वडिलांनी पोलिसांत कोणतीही तक्रार दिली नाही. ते त्यांच्या मुळगावी नांदेड येथे निघून गेले. दरम्यान पोलिसांनी चौकशी सुरूच ठेवली. ठेकेदार बालाजी, जेसीबी चालक जगन्नाथ व एका कामगाराकडे कसून चौकशी केल्यावर त्यांनी ही घटना घडल्याचे सांगितले. त्यानूसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी हडपसर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक शेडगे तपास करत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)