पुणे – जुलैअखेर शहरात इलेक्‍ट्रिक बसची ट्रायल

– स्वारगेट ते पुणे स्टेशन मार्ग निश्‍चित : स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत मिळणार निधी

पुणे – प्रदूषण कमी करून पर्यावरणाचा ऱ्हास रोखण्यासाठी स्मार्ट सिटीअंतर्गत पुढील वर्षभरात शहरातील वाहतूक व्यवस्थेत इलेक्‍ट्रिक बस (ई-बस) सुरू करण्याचे नियोजन आहे. यासाठी भाडेतत्वावर पाचशे ई-बस खरेदी करण्यात येणार आहेत. शहरात प्रथमच ई-बस सेवा सुरू करण्यात येत असून त्याबद्दलची कुठलीही तांत्रिक माहिती प्रशासनाला नाही. यासाठी ट्रायल बेसीसवर शहरात एक इलेक्‍ट्रिक बस धावणार आहे. जेबीएम या कंपनीची ही इलेक्‍ट्रिक बस असून यासाठी स्वारगेट ते पुणे स्टेशन दरम्यानचा मार्ग निश्‍चित करण्यात आला असल्याची माहिती पीएमपीच्या अध्यक्षा नयना गुंडे यांनी दिली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात वाहतुकीसाठी पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या ताफ्यात 2 हजार 33 बसेस आहेत. यामध्ये जवळपास 800 ते 900 बसेस या डिझेलवर; तर उर्वरीत सीएनजीवरील आहेत. स्मार्ट सिटीअंतर्गत शहरातील वाहतूक व्यवस्थेत ई-बस खरेदी करण्याचा निर्णय पीएमपीच्या संचालक मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला होता. त्यानुसार सुरवातीला भाडेतत्वावर 500 ई-बस खरेदी करण्यासाठी निविदा प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. इलेक्‍ट्रिक बसखरेदीसाठी पिंपरी-चिंचवड आणि पुणे स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे; तर त्या बसेस सांभाळण्याची जबाबदारी पीएमपी प्रशासनाकडे असणार आहे.
ई-बससाठी खरेदीसाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च, तंत्रज्ञान, देखभालीसाठी तज्ज्ञांची कमतरता, स्वतंत्र चार्जिंग स्टेशन, देखभाल दुरुस्तीचा खर्च पाहाता यासाठी योग्य नियोजन करावे लागणार आहे. यासाठी सुरवातीला शहरात प्रायोगित तत्वावर एक इलेक्‍ट्रिक बसची ट्रायल घेण्याचे प्रशासनाने ठरवले आहे. यासाठी फुट-ऑन आणि जेबीएम या दोन कंपनींनी पुढाकार घेतला आहे; तर यातील जेबीएम या कंपनीकडून सुरवातीला एक बसची ट्रायल दाखवण्यात येणार आहे. यासाठी पीएमपीकडून स्वारगेट ते पुणे स्टेशन हा मार्ग निश्‍चित केला आहे. यासाठी लवकरच स्वारगेट येथे चार्जिंग स्टेशन उभारण्यात येणार असून जुलै महिन्याच्या अखेरपर्यंत ही ट्रायल घेतली जाणार असल्याचे पीएमपीच्या अध्यक्षा नयना गुंडे यांनी सांगितले. यानंतर त्याचा सविस्तर अभ्यास करून याबाबतचे धोरण ठरवण्यात येणार आहे.
प्रदूषण कमी करून पर्यावरणाचा ऱ्हास रोखण्यासाठी ई-बसची संकल्पना मांडण्यात आली. संचालक मंडळाच्या बैठकीत याबाबत सकारात्मक चर्चा करण्यात आली. भाडेतत्त्वावर या बसेस खरेदी करण्यात येणार असून यासाठी स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत पुणे महापालिकेकडून 70, तर पिंपरी महापालिकेकडून 30 कोटी रुपये उपलब्ध होणार आहे. याचे चार्जिंग स्टेशन्स स्मार्ट सिटी कंपनीच्या माध्यमातून उभे करण्यात येणार आहेत.
———————–
सुरवातीला प्रायोगित तत्वावर एक इलेक्‍ट्रिक बसची ट्रायल घेण्यात येणार आहे. यासाठी जेबीएम या कंपनीने पुढाकार घेतला असून ट्रायलसाठी पीएमपीकडून स्वारगेट ते पुणे स्टेशन हा मार्ग निश्‍चित करण्यात आला आहे. जुलैअखेर ट्रायल प्रक्रिया पूर्ण होईल.
– नयना गुंडे, व्यवस्थापकीय संचालक, पीएमपी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)