पुणे: जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्यास पोलीस कोठडी

पुणे – पूर्ववैमनस्यातून कोयत्याने वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी आणखी एकाला फरासखाना पोलिसांनी अटक केली. त्याला 1 जुलैपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी आर. आर. भाळगट यांनी दिला आहे.

रोहन ऊर्फ बंटी सर्जेराव गायकवाड (वय 27, रा. मंगळवार पेठ) असे पोलीस कोठडी झालेल्याचे नाव आहे. या प्रकरणात यापूर्वी राहुल ऊर्फ लल्ल्या संजय कांबळे (वय 19), विकी सुनील सावंत (वय 29) आणि सुमीत ऊर्फ जयसिंग सर्जेराव गायकवाड (वय 30, तिघेही, रा. मंगळवार पेठ) तिघांवर गुन्हा दाखल आहे. याबाबत सुरज ऊर्फ गणेश अशोक वड्ड (वय 22, रा. मंगळवार पेठ) यांनी फिर्याद दिली आहे. ही घटना 13 ऑक्‍टोबर 2017 रोजी मंगळवार पेठ येथील रामायण मित्र मंडळाजवळ पहाटे 3.45 च्या सुमारास घडली. फिर्यादी, आरोपी मंगळवार पेठेत राहणारे आहेत. पूर्ववैमनस्यातून आरोपींनी फिर्यादी आणि त्यांच्या मित्रांवर कोयत्याने वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचे फिर्यादीत नमुद करण्यात आले आहे. या प्रकरणात पोलिसांनी रोहन याला अटक करून न्यायालयात हजर केले. त्यावेळी तो सराईत गुन्हेगार आहे. अधिक तपासासाठी त्याला पोलीस कोठडी देण्याची मागणी सहायक सरकारी वकील सुरेखा क्षीरसागर यांनी केली. त्यानुसार न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)