पुणे : जीवाची भीती नाही, पण निरापराधांना काही होऊ नये

पार्सल स्फोट प्रकरणानंतर संजय नहार यांची प्रतिक्रिया

पुणे – “मला जीवाची भीती वाटत नाही. त्यामुळे मी पोलीस संरक्षण मागणार नाही. माझे समाजकार्य यापुढेही असेच सुरू राहील. यापूर्वी दोनदा माझ्याविरुद्ध घातपात करण्यात प्रयत्न झाला होता. एकदा अण्णा हजारे यांना काश्‍मीमध्ये घेऊन गेलो होतो, तेव्हा शंभर फुटावरच स्फोट झाला. यामुळे जीवाची भीती वाटत नाही. मात्र, निरापराध विद्यार्थ्यांना काहीही होता कामा नये’, अशी प्रतिक्रिया सरहद संस्थेचे संजय नहार यांनी दिली. नगर येथे एका कुरियर कंपनीत पार्सलचा स्फोट झाला. हे पार्सल संजय नहार यांच्या नावे असल्याचे पोलीस चौकशीत समोर आले. त्यानंतर नहार यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्‍त केली आहे.

काश्‍मीरी व्यक्ती असे करु शकणार नाही
नहार म्हणाले, “मला सकाळी दहा वाजता पोलीसांचा फोन आला तेव्हा मला हसू आले. कोणीतरी मस्करी करत असेल, असे वाटले. मात्र नंतर अनेकांचे फोन येऊ लागल्यावर खरी परिस्थिती कळाली. भीती वाटली नाही. मागील अनेक वर्षापासून पंजाब, काश्‍मीर, नॉर्थ इस्ट येथे काम करत आहेत. यामुळे असे काही घडेल, हे वाटत होते. मला काही झाले असते, तर भीती नसती वाटली. मात्र शाळेत स्फोट झाला असता, तर ते वाईट झाले असते. ज्याच्या कोणाचे माझ्याशी वैर असेल, त्याने माझ्याबरोबर बदला घ्यावा. काश्‍मीरमधील नागरिक असे करणार नाहीत, याची मला खात्री आहे. मात्र, हा पोलीस तपासाचा भाग आहे. आज मी जे काही आयुष्य जगत आहे व जे काही मला संरक्षण आहे ते काश्‍मिरी नागरिकांमुळेच आहे. माझा वैयक्‍तिक कोणीही शत्रू नाही. “सरहद’ बरोबर सगळ्याच विचारांचे लोक आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)