पुणे: जीएसटीबाबत चुकलो तर देशात लोकशाही आहे

केंद्रीय अर्थ राज्यमंत्री शिव प्रताप शुक्‍ला

पुणे – जीएसटी हा कायदा लागू करण्यासाठी सिंगापूरमध्ये पाच वर्षे लागली. जर आम्ही काही निर्णय घेण्यात चुकलो असेल तर देशात लोकशाही आहे. आज आम्ही सत्तेत आहोत, उद्या दुसरा पक्ष सत्तेत असेल, असे मत केंद्रीय अर्थ राज्यमंत्री शिव प्रताप शुक्‍ला यांनी केले.
“मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज ऍण्ड ऍग्रिकल्चर’च्या वतीने आयोजित परिसंवादामध्ये ते बोलत होते. यावेळी खासदार अनिल शिरोळे, अमर साबळे, जीएसटीचे पुणे विभागाचे प्रधान मुख्य आयुक्‍त ए. के. पांडे, प्राप्तीकर विभागाचे पुणे विभागाचे प्रधान मुख्य आयुक्‍त विनोदानंद झा, “एमसीसीआयए’चे प्रमोद चौधरी, चंद्रशेखर चितळे यांच्यासह उद्योजक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शुक्‍ला म्हणाले, जीएसटी आणि प्राप्तीकर संदर्भातील क्रांतिकारी निर्णय घेतले. त्यापोटी एक लाख कोटी रुपये तिजोरीत जमा झाले. देशहितासाठी तुम्ही जीएसटी आणि प्राप्तिकराचा भरणा प्रामाणिकपणे केला. आमच्या धाडसी निर्णयामुळे “इन्स्पेक्‍टर राज’ जाऊन “ऑनलाइन इन्स्पेक्‍टर’ पद्धती आली. केंद्रात स्पष्ट बहुमत मिळवून चार वर्षे पूर्ण करून, मोदी सरकार पाचव्या वर्षांत पदार्पण करीत आहोत. मोदींचा सूर्य अस्ताकडे जात नसून तो पुन्हा उगविण्यासाठी जात आहे. त्यांची प्रतिमा गुजरातचा खलनायक अशी केली होती पण ते विश्‍वनायक आहेत. देशहितासाठी व्यापारी आणि उद्योजकांनी आम्हाला पुढील काळात देखील सहकार्य करावे”, अशी विनंती त्यांनी यावेळी केले.
यावेळी जीएसटीसंदर्भात आढावा प्रधान सचिव ए. के. पांडे यांनी तर प्राप्तिकर विभागाचा प्रधान सचिव विनोदानंद झा यांनी घेतला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चंद्रशेखर चितळे यांनी केले. अनंत सरदेशमुख यांनी आभार मानले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)