पुणे जिल्ह्यात टॅंकरची संख्या रेकॉर्ड तोडणार

पुणे – जिल्ह्यात पाणी टंचाईची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून, दर आठवड्याला दोन ते तीन टॅंकर सुरू करण्याची वेळ प्रशासनावर आली आहे. गतवर्षी सर्वोच्च टॅंकरची संख्या 87 एवढी होती. परंतु, यंदा मार्चमध्येच गतवर्षीचे टॅंकर संख्येचे रेकॉर्ड ब्रेक केले असून, 9 तालुक्‍यांतील 49 गावे आणि 545 वाड्या-वस्त्यांवरील तब्बल 1 लाख 62 हजार 178 नागरिकांची तहान भागविण्यासाठी 87 टॅंकर अहोरात्र पळत आहेत. त्यामध्ये बारामती आणि शिरूर तालुक्‍यातील सर्वाधिक टॅंकरची संख्या आहे.

मार्चमधील टॅंकरची स्थिती पाहता एप्रिल आणि मे महिन्यात टॅंकरची संख्या 100 च्या वर जाणार हे नक्की. बारामती, शिरूर, पुरंदर, दौंड यासह अन्य तालुक्‍यांतील काही गावांमध्ये टॅंकर सुरू करण्याचे प्रस्ताव जिल्हा प्रशासनाकडे आले आहेत. त्याबाबत पाहणी करून टॅंकर सुरू करण्यात येणार आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)