पुणे जिल्ह्यातील भाजपा युवामोर्चाच्या लोणी काळभोर मध्ये निर्मलवारी

वाकी- पंढरीच्या विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी निघालेल्या जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराज व संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्यात सहभागी झालेल्या व मुक्कामी असलेल्या वारकऱ्यांसाठी पुणे जिल्हा भाजयुमोच्या वतीने लोणी काळभोरमध्ये निर्मलवारी अभियान राबविण्यात आले. भाजप युवा मोर्चा पुणे जिल्हा व भाजप युवा मोर्चा खेड तालुका यांच्या संयुक्त विद्यमाने लोणी काळभोर येथे निर्मलवारीचा हा अभिनव उपक्रम राबविण्यात आला. भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष सरपंच सुदर्शन चौधरी, जिल्हा संपर्कप्रमुख धमेंद्र खांडरे यांच्या मार्गदर्शनाखाली व भाजप युवा मोर्चाचे खेड तालुका अध्यक्ष राहुल गवारे, जिल्हा संपर्कप्रमुख संदेश जाधव, जिल्हा चिटणीस विक्रम परदेशी यांच्या नेतृत्वाखाली या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमात विद्यार्थी आघाडीचे तालुकाध्यक्ष चेतन बर्गे, युवा मोर्चाचे शहराध्यक्ष श्‍याम पुसदकर, संतोष हजारे, प्रसाद पवार, शंतनु गायकवाड, किरण टिळेकर, अक्षय शिवळे, समीर भोसले, सुर्यकांत कांबळे, सम्राट तुपे, अमन मिंडे, विक्रम ताराम, सौरव पाडेकर, ईश्वर बर्गे, अमित कड, तुषार दवणे, अखिल पठाण, शरद येळवंडे, प्रसाद येळवंडे, तेजस गवारे, स्वप्निल थिटे, धनंजय कामठे आदींनी भाग घेतला होता.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)