पुणे जिल्ह्यातील पोलिसांसाठी 750 घरे मंजुर

55 गुंडांच्या तडीपारीचा प्रस्ताव
आता 55 गुंडांना तडीपार करण्याचा प्रस्ताव आहेत. यापूर्वी भारतीय दंड विधान 57 प्रमाणे काही प्रस्ताव मंजूर झाले असून प्रांताधिकाऱ्यांचेकडे प्रस्ताव पाठविण्यात आले असल्याचे ग्रामीण पोलीस अधीक्षक सुवेझ हक यांनी नमूद केले.

इंदापूर येथे ग्रामीण पोलीस अधीक्ष सुवेझ हक यांची माहिती

इंदापूर – पुणे जिल्ह्यातील पोलीस कर्मचाऱ्यांच्याकरीता नव्याने 750 घरे बांधण्यासाठी मंजुरी मिळाली असून त्यापैकी 50 घरे इंदापूर येथे बांधण्यात येणार असल्याची माहिती पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक सुवेझ हक यांनी आज (गुरुवारी) इंदापूर येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली.

इंदापूर पोलीस ठाण्याच्या वार्षिक तपासणीसाठी पोलीस अधीक्षक सुवेझ हक आले होते. त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली. यावेळी पोलीस निरीक्षक सजन हंकारे, फौजदार दिनेश कुलकर्णी उपस्थित होते. सुवेझ हक म्हणाले, पुणे जिल्ह्यातील पोलीस कर्मचाऱ्यांच्याकरीता नव्याने वसाहत उभारण्यासाठी प्रस्तावित असलेला प्रस्ताव मंजूर झाला आहे. संपूर्ण जिल्ह्यासाठी 750 घरे बांधण्यात येणार आहे. इंदापूर येथे 50 घरांचे तीन टॉंवर्स उभारण्यात येणार असून पोलीस निरीक्षक व सहाय्यक पोलीस निरीक्षक यांच्याकरिता बंगला व फौजदार ते पोलीस कर्मचाऱ्यांच्यासाठी टू बीएचके अशा सदनिका बांधण्यात येणार आहेत. तसेच प्रशस्त असे पोलीस ठाणे व पोलीस वेल्फेअरमधून पेट्रोल पंप सुरू करण्यात येणार आहे. याबाबी मंजूर झाल्या असून याचा निधी पोलीस हौसिंगकडे आला आहे.

इंदापूर तालुक्‍यातील 40 पोलीस पाटलांची सुवेझ हक यांनी बैठक घेतली. बैठकीत पोलीस पाटील यांचे अधिकार व कर्तव्य याची जाणीव करून दिली.तसेच एक गाव एक सीसीटिव्ही ही योजना राबविण्यात येणार आहे. लोकवर्गणीतून किंवा तंटामुक्‍तच्या निधीतून गावातील चौकात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात यावे.त्याप्रमाणे प्रत्येक गावात 25 तरुणांना ग्रामसुरक्षा दलात नव्याने समाविष्ट करण्यात येणार आहेत. ग्रामसुरक्षा दलातील संख्या बळ वाढविण्यात येणार आहे. ग्रामसुरक्षा दलातील जवानांना बॅंचेस व काठी देण्यात येणार आहे असे त्यांनी नमूद केले. पोलीस पाटलांनी महिलांची दारू बंदी समिती स्थापन करायची आहे. त्यांनी सकारात्मक दृष्टिकोन ठेवून काम करायचे आहे. ते शासनाचे कर्मचारी असल्याने त्यांना परवाने द्यायचे आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)