पुणे जिल्ह्यातच आम्हाला जमिनी द्या

पळसदेव – इंदापूर तालुक्‍यातील शेतकऱ्यांना पर्यायी जमिनीचे वाटप सोलापूर जिल्ह्यात होते. मात्र, या जमीनीचा ताबा घेताना मोठ्या अडचणींचा सामना शेतकऱ्यांना करावा लागत आहे. हक्काची जमीन मिळवण्यासाठी लाखो रुपये खर्च करण्याची वेळ या भागातील शेतकऱ्यांवर आली आहे. त्यामुळे आम्हाला पर्यायी जमिनी पुणे जिल्ह्यातच द्या, अशी मागणी शेतकऱ्यांनी लावून धरली असून संबंधीत गावातील मुलभूत गरजांसह पुनर्वसनाचा प्रश्‍नही गेल्या 40 वर्षांपासून प्रलंबीत आहे. हे प्रश्‍न सोडविण्यासाठी पुणे येथे शुक्रवारी (दि.3) विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले असल्याचे आमदार दत्तात्रय भरणे यांनी सांगितले.
उजनी प्रकल्पबाधीत गावांच्या समस्या सोडवण्यासाठी शुक्रवारी (दि. 3) पुणे येथील विधान भवनात पुणे, सोलापूर जिल्हाधिकाऱ्यांसोबत इंदापूर तालुक्‍यातील शेतकऱ्यांच्या पुनर्वसन बाबतचा प्रश्‍न सोडविण्यासाठी विभागीय आयुक्तांच्या उपस्थितीत विशेष बैठक होत आहे.
उजनी धरणाच्या निर्मितीपासून आज जवळपास 35 ते 40 वर्षे झाली. तरीही प्रकल्प बाधित शेतकरी, नागरिकांचे प्रश्‍न प्रलंबित आहेत. प्रकल्प बाधित गावांत आजही नागरी सुविधा नाहीत. अनेक गावठाणे नियमानुकूल झाली नाहीत, शिवाय वाढती लोकसंख्या विचारात घेऊन नागरिकांना राहण्यासाठी जागेचा प्रश्‍न, दाखले, पुनर्वसीत गावाच्या विकासासाठी निधीची उपलब्धता तसेच पर्यायी जमीन व जागा या सारखे प्रश्‍न प्रलंबित आहेत. हे प्रश्‍न सोडवण्यासाठी खासदार सुप्रिया सुळे यांच्या मार्गदर्शना खाली दोन्ही जिल्ह्याच्या अधिकाऱ्यांची एकत्रित बैठक होत असल्याचेही आमदार भरणे यांनी सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)