पुणे जिल्हा: स्पीड ब्रेकरमुळे दुखावतोय कणा

नियमबाह्य असल्याच्या तक्रारी
रस्त्याचे कंत्राटदार मनमानीपणे गतिरोधक बांधत आहेत. गतिरोधक दुरून नजरेत यावेत, याकरिता अंधारातही चमकतील असे पांढरे पट्टे त्यावर मारणे गरजेचे आहे; परंतु कित्येक ठिकाणी हे पट्टे नसल्याने चालक गोंधळून जातात. अपघात टाळावेत यासाठी सातत्याने तक्रारी करून हे गतिरोधक बसविण्यात आले आहेत. पण ते नियमबाह्य असल्याच्या तक्रारी अलीकडच्या काळात वाढू लागल्या आहेत. गतिरोधक बांधताना त्यांची लांबी, रुंदी आणि उंची निश्‍चित करण्यात आली आहे का? आदी नियमांचे पालन न केल्याचे चित्र शहरात दिसत आहे.

बारामती शहरातील स्थिती : नियम पायदळी तुडवून उभारले गतिरोध

जळोची – बारामती शहरात जागो-जागी रोडवर, दुकानासमोर गतिरोधक टाकले गेले आहेत. या गतिरोधकांमुळे अनेकांना पाठीदुखी, मणक्‍याचे आजार उद्‌भवू लागले असल्याचे ज्येष्ठ नागरिकांनी सांगितले.

बारामती शहरातील अनेक भागात गतिरोधकाचे नियम सर्रासपणे पायदळी तुडविले गेले असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे अनेकांना पाठ व कंबरदुखीचा त्रास होवू लागला आहे. अनेकांच्या वाहनांचे देखील नुकसान होत असल्याने त्यांच्या तक्रारी वाढल्या आहेत. गतिरोधकांमुळे नागरिकांना त्यांच्या शरीरावर दुष्परिणाम भोगावे लागत आहेत. अनेक चालक, प्रवाशांना पाठ, मणका, शरीरावर गंभीर परिणाम होत आहेत. सतत बसणाऱ्या झटक्‍यामुळे पाठीत आणि मणक्‍यात दुखणे, चिडचिड होणे, विशेषता गर्भवती महिला, लहान मुले आणि वृद्ध व्यक्‍तींवर अधिक गंभीर परिणाम होत आहेत.शहरातील वाहनांची गर्दी आणि वाढलेले अपघात यावर काही प्रमाणात नियंत्रण ठेवण्यासाठी गतिरोधकांचा उपयोग होतो; परंतु ते चुकीचे बनविल्याने गतिरोधकांबद्दल चालकांच्या मनात असुरक्षिततेची भावना निर्माण होत आहे. शहरात पादचाऱ्यांची सुरक्षेचा प्रश्‍नही ऐरणीवर आला आहे. पादचाऱ्यांना रस्ता ओलांडणे देखील अवघड बनले आहे. तसेच मुख्य रस्त्यांवर जागोजागी गतिरोधक असल्याने ते चुकविण्यासाठी वाहनचालक सर्रासपणे रहिवासी भागातील रस्ते वापरत आहेत. त्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे नगरपालिका व प्रशासनाने शहरातील रस्त्यावर देखरेख ठेवणे आवश्‍यक आहे. मात्र, त्यांचे रस्त्याकडे दुर्लक्ष झाल्याने सर्वच रस्त्याची वाट लागत आहे. नको तेथे गतिरोधक असल्याने नागरिकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत असल्याचे नागरिकांनी सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)