पुणे जिल्हा: सावित्रीबाई फुले विद्यालयाच्या वाणिज्यचा 100 टक्के निकाल

संग्रहित छायाचित्र

ओतूर – ओतूरच्या सावित्रीबाई फुले विद्यालचा इयत्ता बारावी (मार्च 2018) परीक्षेचा निकाल लागला असून वाणिज्य (कॉमर्स) शाखेत एकूण 45 विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. त्यापैकी 45 विद्यार्थी पास झाले असून वाणिज्य शाखेचा शेकडा निकाल 100 टक्के लागला आहे. तसेच कला शाखेत एकूण प्रविष्ट विद्यार्थी 40 पैकी 35 विद्यार्थी पास झाले असून शेकडा निकाल 87.50 टक्के लागला आहे.

कला शाखेत प्रथम प्रतिक्षा बाबाजी कुमार 74.76 टक्के, द्वितीय जयश्री किसन भगत 74.61 टक्के, तृतीय अक्षदा चंद्रकांत मुठे 73.53 टक्के मिळवून पास झाली आहे. तर, वाणिज्य शाखेत प्रथम धनश्री सुभाष घाडगे 80.30 टक्के, द्वितीय श्रृतिका सिताराम उर्किर्डे 75.53 टक्के आणि तृतीय मुस्कान रज्जाक इनामदार 73.38 टक्के मिळाले आहे. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संरथेचे अध्यक्ष विशाल तांबे, उपाध्यक्ष श्रीहरी तांबे, सचिव वैभव तांबे, प्राचार्य दिलीप बोबडे यांनी हार्दिक अभिनंदन केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)