पुणे जिल्हा: सरपंचाकडून मनमानीपणे वित्तग्रामसभा

ग्रामपंचायत सदस्य दिलीप थोरात यांचा आरोप : विविध कारणांनी सभा केली तहकूब

रांजणगाव गणपती – 1 एप्रिल ते 30 मेपर्यंत वित्तग्रामसभा घेणे कायद्याने बंधनकारक असतानाही सरपंचांनी मनमनीपणे वित्तग्रामसभा वेळेत घेतली नसल्याचा आणि पदाचा गैरवापर केल्याचा आरोप ग्रामपंचायत सदस्य दिलीप थोरात यांनी केला आहे. मुंबई ग्रामपंचायत अधिनियम 1959 चा कलम 7 (1) नुसार ग्रामपंचायतच्या सरपंच आणि सदस्यांनी 1 एप्रिल ते 30 मेपर्यंत वित्तग्रामसभा घेणे कायद्याने बंधनकारक असतानाही पहिली मासिकसभा 23 एप्रिलला घेण्याचे ठरले. वित्तसभा 24 ला घेण्याचे ठरले. ही सभा गणपुर्ती अभावी तहकूब केल्यानंतर तहकूब सभा 28 एप्रिल रोजी घेण्याचे ठरले. 28 एप्रिलच्या ग्रामसभेला नागरिक जमले असता पुरेशा कारणाशिवाय ग्रामसभा घेण्याचे टाळले. त्यानंतर सरपंचानी ग्रामसेवकांना सांगून मे महिन्याची मासिक बैठक लावली. मागील एप्रिल महिन्यातील सर्व विषय पुन्हा घेण्यात आले. त्यानंतर वित्तग्राम सभा परत लावण्यात आली. ती वित्तग्राम सभा 29 मे 2018 रोजी लावण्यात आली. ही वित्तग्रामसभा गणपुर्ती अभावी पुन्हा तहकुब झाली. सरपंचानी तहकुब सभा घेण्यासाठी परत सूचना पञ काढले. ही तहकूब वित्तग्रामसभा 7 जून रोजी घेण्याचे ठरवले. 7 जूनच्या ग्रामसभेला सुरूवात करताना सरपंच हे त्या ग्रामसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतानाही सरपंचाची अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. या सभेला सुरूवात झाल्यावर ग्रामसेवकाने सभेचे कामकाज वाचनाला सुरूवात केली असता ग्रामस्थांनी आक्षेप घेतला. या सभेचे कामकाज वाचन सरपंचांनी केले पाहिजे, असा आग्रह धरला. त्यावर सरपंचानी माझी मनस्थिती ठिक नाही. मला दिसत नाही म्हणून माझ्या अध्यक्षतेखाली मी सांगतो, त्या ग्रामपंचायत सदस्याने सभेचे कामकाज करायचे, असा हुकुमशाही पद्धतीने आदेश दिला. वास्तविक या मागचे खरे कारण सरपंचाना वाचता येत नाही. आपला अज्ञानपणा झाकण्यासाठी सरपंचानी कायद्याची पायमल्ली केली. एकाच विषयावर चार वेळा ग्रामसभा बोलावून ग्रामस्थांचा वेळ वाया घालवला असल्याचा आरोप भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष सुरेश थोरात, माजी उपसरपंच राजेंद्र भोसले, ग्रामपंचायत सदस्य दिलीप थोरात, किसन गोरडे यांनी केला आहे. याबाबत आपण गट विकास अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार केली असून योग्य ती कार्यवाही करावी, अशी मागणी केली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)