पुणे जिल्हा: श्री समर्थ विद्यालयाचा 81.81 टक्के निकाल

संग्रहित छायाचित्र

चिंबळी – श्री समर्थ शिक्षण प्रसारक मंडळाच्या चिंबळी फाटा (त. खेड) येथील श्री समर्थ उच्च माध्यमिक विद्यालयाचा इयत्ता 12वीचा निकाल एकूण निकाल 81.81 टक्के लागला आहे, असे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष शिवाजी गवारे यांनी सांगितले.

विद्यालयतील वाणिज्य शाखेचा 98 तर कला शाखेचा 74 टक्के निकाल लागला आहे. लागला आहे. तर खराबवाडी येथे समर्थ ज्युुनियर कॉलेजचा निकाल 84 टक्के लागला आहे. चिंबळी फाटा येथील वाणिज्य शाखेत सुनील गिरम सुनील 78, मयुरी जैद 71.38 तर ऋतिक मुऱ्हे 71.23 यांनी अनुक्रमे प्रथम द्वितीय तृतीय क्रमांक पटकवला आहे. कला शाखेत पल्लवी खडसे 65.07, साक्षी देसाई 61.07, वैष्णवी कड 56.76 टक्के गुण मिळवून अनुक्रमे प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक पटकवाल आहे. यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष शिवाजी गवारे, कार्याध्यक्षा विद्या गवारे, प्राचार्य अनिता टिळेकर, प्राचार्य भद्रे, प्राचार्य राम मद्गुले, सपना आंबेकर, बवले प्रिया, फलके कोमल यांनी अभिनंद केले आहे. तर खराबवाडी येथील श्री समर्थ जुनियर कॉलेजच्या वाणिज्य शाखेत धनंजय कदम 70.92, पूजा माने 64.76 पवन जाधव 63.23टक्के गुण मिळवून अनुक्रमे प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक पटकवला आहे. कला शाखेत रामजी होके, गणेश राक्षे, माधव भिंगोरे यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक मिळवला आहे. यशस्वी विद्यार्थ्यांसह त्यांच्या मार्गदर्शक शिक्षक निलम डोंगरे, शिल्पा शिकारे, विकस लोहार, नवनाथ कोळेकर, शशिकांत सूर्यवंशी शशिकांत, स्वाती निमसे, प्रिती गौड यांचे सर्वस्तरातून अभिनंद होत आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)