पुणे जिल्हा: शेतीच्या बांधावर कृषिकन्या देताहेत तंत्रज्ञानाचे धडे

यवत – प्रत्येक देशाचा विकास हा त्या देशातील ग्रामीण भागातील शेती विकासाच्या अर्थव्यवस्थेवर अवलंबून असतो. आजच्या घडीला भारतामध्ये शेती करणाऱ्यांची संख्या अधिक आहे. म्हणूनच भारत देशाला ‘कृषिप्रधान’ देश म्हणून संबोधले जात आहे. ग्रामीण भागातील शेतकाऱ्यांच्या समस्या कळल्यावर त्यावर शोधता येतात. म्हणूनच ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या शेतीतील अडीअडचणी सोडविण्यासाठी आणि या शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचे धडे देण्यासाठी कृषी महाविद्यालयाच्या कृषिकन्या शेतीच्या बांधावर पोहचल्या आहेत.

महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत कृषी महाविद्यालय पुणे येथील कृषी विभागाच्या चौथ्या वर्षात शिकणाऱ्या कृषिकन्या यांनी दौंड तालुक्‍यातील भांडगाव या गावाची निवड केली आहे. या कृषिकन्या गावातच पाच महिने राहून शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचे धडे देत आहेत. यामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेती निरीक्षण, माती परीक्षण, कमी जमिनीत अधिक उत्पादन घेणे, पाळीव जनावरांचे लसीकरण आदी प्रात्येक्षिके दाखविण्यात येणार आहेत. त्याचबरोबर ग्रामीण जनतेमध्ये जनजागृतीचे काम या कृषिकन्या करणार आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

या कृषिकन्यामध्ये आरती नाळे, कोमल फडतरे, मयुरी पाटील, अश्विनी नवले, स्वाती धायल, ऐश्वर्या रणदिवे ह्या या उपक्रमामध्ये सहभागी झाल्या आहेत. गावात तब्बल पाच महिने राहून परिसरातील शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीच्या बांधावर जाऊन आधुनिक तंत्रज्ञानाचे धडे देणार आहेत. या कृषिकन्यांचे सरपंच कमल टेळे, उपसरपंच रविंद्र दोरगे, विजय शेंडगे, शिवाजी चव्हाण, ग्रामविकास अधिकारी प्रकाश जाधव यांच्यासह आदी ग्रामस्थांनी उस्फूर्तपणे स्वागत केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)