पुणे जिल्हा: शेतमजुरांच्या टंचाईमुळे चिंबळीत हातखुरपणी सुरू

चिंबळी – पुणे जिल्हातील ग्रामीण भागात खेड तालुक्‍याच्या दक्षिण भागातील जिल्हा परिषद व पंचायत समिती गणातील निघोजे, कुरूळी, चिंबळी, सोळू, धानोरे, मरकळ आदी भागात शेती कामासाठी मजुरांची मोठ्या प्रमाणात टंचाई भासत असल्याने रब्बी हगांमातील, तसेच उन्हाळी हगांमात शेतीची कामे करण्यासाठी शेतकऱ्यांना स्वतःच राबावे लागत आहे.

चिंबळी परिसरात गेल्या एक महिन्यापूर्वी झेंडू, गुलछडी, अष्टर आदी फुलांच्या रोपांची लागवड केली असून, या फुलांची रोपांत गवताचे तण उगवले असून खुरापणीसाठी शेतमजूर मिळत नसल्याने शेतकरी स्वतःच हातकोळपणी करण्यात मग्न आहेत. गेल्या पंधरा दिवसापासून शेतीचे नुकसान होऊ नये आणि केलेला खर्च वाया जाऊ नये म्हणून शेतकरी स्वतःच काम करताना दिसत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)