पुणे जिल्हा: शेकऱ्यांसाठी हे सरकार कर्दनकाळ

अतुल खुपसे : 54 फटा येथे दूध उत्पादकांनी इंदापूर-बारामती महामार्ग रोखला

निमसाखर- सध्या भाजप शिवसेना सरकारने दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी दुधाला प्रतिलिटर 27 रुपये बाजारभाव जाहीर केला. तरी सुद्धा दूध उत्पादक शेतकऱ्यांना 17 ते 19 रुपये प्रतिलिटर प्रमाणे दुधाला बाजारभाव मिळत आहे. तसेच शेतकऱ्यांनी मोठ्या मेहनतीने विविध बॅंकांचे लाखो रुपयांचे कर्ज घेऊन शेती पिकवली; परंतु पिकविलेल्या कोणत्याच शेतीमालाला सध्या बाजारभाव नाही. यामुळे शेतकरी कर्जबाजारी होऊन आत्महत्या करू लागला आहे. सध्याचे सरकार हे शेतकऱ्यांना कर्दनकाळ ठरला असून “अच्छे दिन’चे स्वप्न दाखवत सतेत आलेल्या भाजप-शिवसेना सरकारने बळीराजाची चेष्टा लावली आहे; परंतु या सरकारला ते महागात पडले, अशा इशारा प्रहार शेतकरी संघटनेचे पश्‍चिम महाराष्ट्राचे संपर्क प्रमुख अतुल खुपसे यांनी दिला आहे.

-Ads-

इंदापूर-बारामती महामार्गावर इंदापूर तालुक्‍यातील 54 फाटा आज (बुधवार) प्रहार शेतकरी संघटना व तालुक्‍यातील दूध उत्पादक व शेतकऱ्यांच्या वतीने विविध मागण्या सरकारने मान्य कराव्यात म्हणून “चक्काजाम’ आंदोलन करण्यात आले होते. त्यामुळे शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना खूपसे बोलत होते. यावेळी शेतकऱ्यांनी जवळपास दीड तास इंदापूर-बारामती महामार्ग रोखून धरला होता. यामुळे इंदापूर-बारामती महामार्गावर 54 फाटा येथे दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने वाहतूक ठप्प झाली होती. यावेळी नीरा-भीमा कारखान्याचे अध्यक्ष लालासाहेब पवार, गौतमेश्‍वर विद्यालयाचे अध्यक्ष दिनकर नलवडे, प्रहार शेतकरी संघटनेचे सोलापूर अध्यक्ष रमेश पाटील, पुणे जिल्हाध्यक्ष धनंजय भोसले, प्रहार कामगार आघाडीचे महाराष्ट्र अध्यक्ष निरज कडू, पंढरपूर तालुकाध्यक्ष नाना इंगळे, बंडू पवार, शेतकरी संघटनेचे हरिदास पवार, सतीश मोरे, शिवसेनेचे ऍड. नितीन कदम, पोपट नलवडे, संजय राऊत, फिरोज पठाण, माऊली मुलमुले, विष्णुपंत कुमकले, अभी कदम, माऊली जगताप, सतीश चावले, दादा पवार, अतुल ताकमोघे, सुनील बनसोडे, राजकुमार राऊत, आबा आदलिंग, अमोल जाधव, गणेश राऊतसह मोठ्या संख्येने शेतकरी व दूध उत्पादक शेतकरी उपस्थित होते. यावेळी वालचंदनगरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक उत्तम भजनावळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस सहाय्यक निरीक्षक शिवाजी होले, बीट हवालदार महेंद्र फणसे, गणेश काटकर, तावरे, सातव आदीने चोख बंदोबस्त ठेवून वाहतूक सुरळीतपणे सुरू करण्यास मदत केली.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)