पुणे जिल्हा: शिवे येथे जाळले पवनचक्कीचे दरवाजे

वाकी – देव भावनेतून चोरट्याने खेड तालुक्‍याच्या पश्‍चिम भागातील शिवे ते कोळीये या रस्त्याच्या दरम्यान 36 नंबरच्या टावरलगत असलेल्या पवनचक्कीचे दरवाजे चेंबून ते जाळल्याचा विचित्र प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी चाकण पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध सोमवारी (दि. 21) रात्री उशिरा गुन्हा दाखल केला आहे. दिलीप पोपट शिवेकर ( वय 32, रा. शिवे, ता. खेड ) यांनी फिर्याद दिली आहे.

शिवे ते कोळीये दरम्यान 36 नंबर टावर जवळ पवनचक्की आहे. या पवनचक्कीच्या दरवाजा जवळ चोरट्यांनी देव भावनेतून सोमवारी सायंकाळी सातच्या सुमारास रॉकेल ओतून तेथे मोठा जाळ केला. त्यांनतर त्या पवनचक्कीचे दरवाजे कशाच्या तरी सहाय्याने चेंबवून जाळून टाकले. यात तब्बल दीड लाख रुपयांचे नुकसान झाले असून, यातील नेमका खरा प्रकार अद्याप समजला नसल्याचे येथील पोलिसांनी स्पष्ट केले. पुढील तपास पोलीस निरीक्षक मनोजकुमार यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार विलास गोसावी व त्यांचे करीत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)