पुणे जिल्हा: शंभो महादेवाच्या भक्‍तांना चहा, सरबत वाटप

नीरा नरसिंहपूर -शिखर शिंगणापूर येथील शंभो महादेवाच्या यात्रेसाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविक दाखल होऊ लागले आहेत. रस्त्याने पायी चालत चाललेल्या भक्तगणांना सरबत, चहाचे वाटप सामाजिक संस्थाच्या कार्यकर्त्यांकडून केले जात आहे.

बावडा-नरसिंहपूर मार्गावर शिंगणापूरकडे मराठवाडा व विदर्भातून पायी चालत असलेल्या भक्तगणांना वाटेतील गावात चहा, नाष्टा, जेवण, सरबताचे वाटप केले जात आहे. बहुजन क्रांती संघटनेच्या वतीने गणेशवाडी, टण्णू येथे सरबतचे वाटप करण्यात आले. संघटनेचे प्रदेशाध्यक्ष संतोष खंडागळे, तालुका कार्याध्यक्ष मोहन खंडागळे, पप्पू खंडागळे, अजीत माने, वैभव साठे, समीर खंडागळे, प्रदीप साठे, मुजाहीद तांबोळी, आशासेविका रफिया तांबोळी आदिंनी सरबत वाटप केले. नरसिंहपूर येथील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कुलदैवत तीर्थक्षेत्र लक्ष्मी नरसिंह दर्शन घेऊन भाविक पुढील वाटचाल करीत आहेत. मागील चार दिवसांत लाखो भाविक शिखर शिंगणापूर मार्गाने चालत गेले आहेत. रस्त्याचे काम अपूर्ण असून पुढील वर्षी रस्ता पूर्ण होईल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)