पुणे जिल्हा: व्यापाऱ्यांची फसवणूक करणारा जेरबंद

लोणी काळभोर – सासवड (ता. पुरंदर) येथील सुधीर माणिकचंद मुथा यांच्या सिमेंट विक्रीच्या दुकानातून मे 2016 मध्ये सुमारे 18 लाखांचे सिमेंट परस्पर नेऊन विक्री करणाऱ्या इसमास सातारा पोलिसांनी बुधवारी (दि. 28) जेरबंद केले आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की मे 2016 मध्ये सासवड (ता. पुरंदर) येथील मुथा यांच्या सिमेंट विक्रीच्या दुकानातून योगेश कांतिलाल शहा (वय 40, रा. नऱ्हे रोड, धायरी, ता. हवेली, जिल्हा पुणे, सध्या रा. विकासनगर, गजानन दर्शन, सातारा) याने 17 लाख 97 हजार 816 रुपये किमतीच्या सिमेंटची परस्पर विक्री करून मुथा यांची फसवणूक केली होती. गुन्हा केल्यापासून हा आरोपी फरार होता. तो सातारा येथे राहत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस नाईक महेश गायकवाड, नीलेश कदम, सचिन गायकवाड यांना मिळाली. त्यानंतर हे पथक सातारा येथे तपासासाठी गेले असता हा आरोपी आदर्श नगर चौकात येणार असल्यची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्यजा पथकास मिळाली. योगेश शहा या ठिकाणी आला असता, त्याला शिताफीने पथकाने जेरबंद केले आहे. या आरोपीवर चाकण, मंचर, खेड, सिंहगड रस्ता पोलीस स्थानकात फसवणुकीचे गुन्हे दाखल असून, याबाबत पुढील तपास पोलीस निरीक्षक दयानंद गावडे करीत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)