पुणे जिल्हा: विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या

हुंड्यासाठी मानसिक, शारीरिक छळ

वाघोली – हुंड्याची मागणी करत मानसिक आणि शारीरिक छळ केल्याने विवाहित महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना वाघोली येथील जे जे नगर परिसरात सोमवारी (दि. 19) सायंकाळी सव्वासहाच्या सुमारास घडली. विवाहित महिलेला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी चौघांवर लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. आरती श्रीकांत गावडे असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे याप्रकरणी सासरे गुलाबराव सीताराम गावडे, पती श्रीकांत गुलाबराव गावडे, सासू शकुंतला गुलाबराव गावडे, नणंद नीता दत्तात्रय लांडे यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रीकांत आणि आरती यांच्या लग्नानंतर 20 लाख रुपये आणि 35 तोळे हुंड्याची मागणी केली जात होती. हुंडा न दिल्याने आरतीचा मानसिक व शारीरिक छळ होत होता. सोमवारी (दि. 19) आरतीजवळून तिच्या मुलाला घेऊन शिवीगाळ केली. यामुळे आरतीने जे जे नगर येथील राहत्या घरामध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येची माहिती आरतीच्या माहेरच्यांना समजताच वाघोली येथील त्यांच्या घराची, वाहनांची तोडफोड केली गेली. येथील वातावरण तणावाचे झाल्यामुळे लोणीकंद पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली. शेखर सोपान काळभोर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक उत्तमराव सस्ते करीत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)