पुणे जिल्हा: विद्या विकास मंदिर राजुरीचा 92.20 टक्के निकाल

अणे -राजुरी (ता. जुन्नर) येथील विद्या विकास मंदिर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचा इयत्ता बारावीचा तीनही शाखेचा निकाल एकूण 92.20 टक्के लागला आहे, अशी माहिती विद्यालयाचे प्राचार्य कैलास शेटे हयांणी दिली.

यामध्ये कला शाखेचा निकाल 70 टक्के लागला असून सिद्धेश कचरू जाधव 62 टक्के प्रथम, सुशांत तुळशिराम औटी 59.38 टक्के द्वितीय, तर तिसरा क्रमांक वैभव विठ्ठल कणसे 58 टक्के याचा आला आहे. तर वाणिज्य शाखेचा निकाल 96.66 टक्के लागला असून प्रथम क्रमांक गौतमी भाऊ औटी 78 टक्के, मोहिनी संतोष औटी 77.38 टक्के तर रूपाली जालिंदर औटी 77 यांचे प्रथम तीन क्रेमांक आलेत. विज्ञान शाखेचा 98.66 टक्के निकाल लागला असून प्रवीण मंजाभाऊ हाडवळे 78.62 टक्के, रोशन शिवाजी डुंबरे 77.69 व ज्योती अंकुश कणसे 74.92 हे विद्यार्थी पहिल्या तीनमध्ये आलेत. सर्व यशस्वी विद्यार्थी तसेच शिक्षकांचे पंचायत समिती माजी सभापती दीपक औटी, जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या स्नेहल शेळके, गावचे सरपंच माऊली शेळके, उपसरपंच चंद्रकांत जाधव, वल्लभ शेळके, एम. डी. घंगाळे, एकनाथ शिंदे, जनता विकास मंडळाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर गटकळ, सचिव सतीश पाटील औटी, नामदेव हाडवळे, रामदास सरोदे, काशिनाथ औटी तसेच गावातील सर्व संस्थांचे पदाथिकारी वर्गाने अभिनंदन केले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)