पुणे जिल्हा: विद्यार्थ्यांच्या मनाचा कौल ओळखून शिक्षकांनी शिकवावे

सासवड – आजचे विद्यार्थी आणि विद्यार्थिनी हुशार आहेत, शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या मनाचा कौल जाणून शिक्षण द्यावे, मुलांच्या मनाची शगत करावी. अभ्यासबरोबरच त्यांच्या मैदानी खेळाकडेही लक्ष द्यावे. मुली निसर्गतःच हुशार असतात, महिला शिकल्या तरच देश जाईल असे मनोगत विजय कोलते यांनी व्यक्त केले .

सासवड येथील आचार्य अत्रे प्रतिष्ठान आणि आचार्य अत्रे शिक्षक व शिक्षकेतर सेवक सहकारी पतसंस्थेच्या वतीने 10 वी, 12 वी परीक्षेत प्रथम आलेल्या पुरंदर तालुक्‍यातील प्रत्येक विद्यालयातील विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ साजरा झाला. यावेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष विजय कोलते अध्यक्षपदावरून बोलत होते. यावेळी वाबळेवाडी येथील ओजस इंटरनॅशनल स्कुलचे मुख्याध्यापक दत्तात्रय वारे आणि अखिल भारतीय नाट्य परिषद, शिरूर शाखेच्या अध्यक्षा दीपाली शेळके प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. पुरंदरमधील माध्यमिक शाळेतील 65, तर ज्युनियर कॉलेज मधील 12 विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

वाबळेवाडी शाळेत चार वर्षपूर्वी फक्त 22 विद्यार्थी होते; परंतु विद्यार्थ्यांची गुणात्मक वाढ, शिक्षकांचौ शिकवण्याचे कौशल्य यामुळे शाळेचे नाव वाढले, आता येथे 400 विद्यार्थी आहेत आणि अजून प्रतीक्षा यादी मोठी आहे. येथील विद्यार्थ्यांनी देशाचे नाव जगात पोचवावे, असे प्रतिपादन दत्तात्रय वारे यांनी केले. दीपाली शेळके, आत्माराम शिंदे, नंदकुमार सागर यांनी मनोगत व्यक्त केले. अपूर्वा पवार, अश्विनी कदम, पूजा शिंदे, हर्षदा खेडेकर, ज्ञानेश्वरी कोलते, शुभांगी कामथे, अभिषेक रासकर, गौरव लोणारी या विद्यार्थ्यांनी सत्काराला उत्तर दिले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पत संस्थेचे चेअरमन चंद्रकांत फुले यांनी केले, तर आभार वसंतराव ताकवले यांनी मानले. सचिन धनवट व शिवाजी घोगरे यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी प्रतिष्ठानचे सचिव शांताराम पोमण, पत संस्थेचे सचिव दिलीप पापळ, सुधाकर जगदाळे,रामप्रभू पेठकर, अशोक बारणे, सुरेश देशपांडे, सचिन घोलप यांच्यासह पालक व शिक्षक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)