पुणे जिल्हा: वाकीतील हॉटेलवर एलसीबी पोलिसांचा छापा

वेश्‍या व्यवसाय करताना रंगेहाथ पकडले : गुन्हा दाखल
एक मुलगी व दोन दलालांना घेतले ताब्यात

चाकण – पुणे-नाशिक महामार्गावरील भाम जवळील वाकी खुर्द गावच्या हद्दीतील श्रावणी हॉटेलवर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी छापा टाकून वेश्‍या व्यवसाय करणाऱ्या एका मुलीसह, दोन दलालास ताब्यात घेतले असून त्यांच्यावर चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा छापा आज (बुधवारी) दुपारी अडीच ते सायंकाळी साडेचारच्या दरम्यान टाकला.

दर्शना आनंद शिंदे (वय 22, विलेपार्ले पूर्व, मुंबई), मुलीला घेऊन येणार दलाल रोहित विलास कदम ( वय 23, रा. गोळेगाव, ता.जुन्नर, सध्या रा. आंबेठाण चौक, चाकण, ता.खेड) व वेश्‍यागमनाचा मोबदला स्वीकारणारा हॉटेलचा मॅनेजर सूरज जीवन बोंबसाळे (वय 27, रा. हलकी, ता. शिरूर अनंतपाळ, जि.लातूर, सध्या रा. पुणे) यांच्यावर रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एलसीबी पथकाने तिघांनाही ताब्यात घेऊन चाकण पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. तर पोलीस उपनिरीक्षक रेखा गोरोबा दूधभाते (वय 30) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी बोगस गिऱ्हाईकामार्फत दिलेले चार हजार रुपये, तीन कंडोमची पाकिटे व एक मोबाईल जप्त केला आहे. गुप्त खबऱ्या मार्फत पोलीस नियंत्रण कक्षाला आलेल्या फोनवरून वाकी येथील श्रावणी हॉटेल वर वेश्‍या गमनासाठी मुली पुरविल्या जात असल्याची माहिती मिळाली. स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक राजू मोरे, पीएसआय आर. ई. कांबळे, पीएसआय रेखा गोरोबा दूधभाते, महिला पोलीस हवालदार एस. एस. लोंढे यांच्या पथकाने बोगस गिऱ्हाईक पाठवून वेश्‍या गमनाकरिता मुली पुरविल्या जात असल्याची खात्री होताच हॉटेलवर छापा टाकून सर्वांना रंगेहाथ पकडले. पोलीस निरीक्षक धन्यकुमार गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली चाकण पोलीस पुढील तपास करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)