पुणे जिल्हा : लोणी गावात कडकडीत बंद

ग्रामस्थांनी काढला मूकमोर्चा


दहशत मोडून काढण्याचे पोलिसांचे ग्रामसभेमध्ये आश्‍वासन

लाखणगाव- लोणी (ता. आंबेगाव) येथे गवळी गॅंगच्या वतीने खंडणीच्या मागणीवरून दाखल झालेल्या गुन्ह्याच्या संदर्भात गुन्हेगारांवर कडक कारवाई व्हावी. या मागणीसाठी लोणी गाव कडकडीत बंद ठेऊन मूक मोर्चा आणि ग्रामसभेचे आयोजन मंगळवारी (दि. 24) करण्यात आले होते. गवळी गॅंगच्या दहशतीविरोधात सगळे ग्रामस्थ एकवटले असून संबंधितांवर कारवाईची मागणी केली.

स्वतःच्या छोट्याशा स्वार्थासाठी आपण एखाद्या गोष्टीची पाठराखण करतो. भविष्यात त्याच गोष्टीचा त्रास आपल्याला व गावाला होतो. त्यामुळे भविष्याचा विचार करून चुकीच्या गोष्टीची पाठराखण करू नका. गावात चालणाऱ्या चुकीच्या धंद्यांवरही कारवाईसाठी गावाने पुढाकार घ्यावा. ते बंद करण्यासाठी सर्व प्रकारचे सहकार्य केले जाईल.
– प्रकाश धस, पोलीस निरीक्षक, मंचर

याप्रसंगी ग्रामसभेमध्ये मंचर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रकाश धस, सरपंच सावळाराम नाईक, सोनाली जाधव, उर्मिला धुमाळ, सुनिता कदम, माधुरी आढाव, पिंटु पडवळ, बाळासाहेब कोयर आदी मान्यवर आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी पोलीस निरीक्षक धस म्हणाले की, खंडणीबाबत ज्या लोकांवर गुन्हे दाखल झाले आहेत. त्यांच्यापासून घाबरण्याचे कोणतेच कारण नाही. हे प्रकरण इतकेही मोठे नाही, कोणाच्या नावाचा वापर करून गुन्हेगारी करत असेल तर त्याच्यावर कारवाई होणारच आहे.

गावातील कोणत्याही व्यक्‍तीला येथून पुढील काळात कोणाकडून त्रास होणार नाही. याची दखल पोलीस प्रशासनाच्या वतीने घेतली जाईल. खंडणी मागणारे लोक हे खूप छोटे आहेत. त्यांच्यापासून घाबरण्याचे कारण नाही. या शब्दात ग्रामस्थांना धीर देऊन कायद्यापेक्षा कोणीही मोठा नाही.

खंडणी बहाद्दरांना जरब बसावा यासाठी पोलीस खात्याकडून सक्षमपणे कारवाई केली जाईल. कायद्यापेक्षा कोणीही मोठा नाही.त्यामुळे नागरिकांनी निर्भयपणे रहावे. व्यापाऱ्यांनी आपले व्यवहार सक्षमपणे करावे. पोलीस तुमच्याबरोबर आहे. या शब्दात मंचर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धस यांनी ग्वाही दिली.

पोलीस निरीक्षक धस म्हणाले की, गावात जर काही चुकीचे घडत असेल तर लोकांनी एकत्र येऊन त्यांच्या विरोधात आवाज उठवला पाहिजे. ग्रामस्थांच्या आवाजाला पोलिसांची साथ असेल. कायद्यापेक्षा कोणीही मोठा नाही. त्यामुळे घाबरून जाण्याचे कारण नाही. या शब्दात धस यांनी ग्रामस्थांना धीर दिला. आपल्या देशात लोकशाही आहे. इथे कायद्याचे राज्य आहे. त्यामुळे कायद्यापेक्षा कोणीही मोठा नाही.नागरिकांच्या अडचणी सोडवण्यासाठी पोलीस प्रशासन चोवीस तास कार्यरत आहे. आपण त्यांना माहिती द्यावी, असे आवाहन धस यांनी केले. लोणी आणि परिसरात लवकरच और पोस्ट व्हावी. अशी मागणी यावेळी ग्रामसभेत मांडण्यात आली. त्याला सर्वानुमते संमती देण्यात आली.

यावेळी मंचर पोलीस ठाण्याचे विनोद गायकवाड, अंकलेश्‍वर भोसले उपस्थित होते. दिलीप वाळुंज, उद्धव लंके, लक्ष्मण सिनलकर, राजू आदक, अशोक आदक, खडकवाडीचे सरपंच अनिल डोके यांनी आपले मत मांडले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)