पुणे जिल्हा: राजुरी ग्रामपंचायतीला 180 झाडे

बेल्हे -राजुरी (ता. जुन्नर) येथे युनिटी फाऊंडेशनच्या वतीने 180 झाडे ग्रामपंचायतला देण्यात आली.
माजी सरपंच माऊली शेळके, युनिटी फाऊंडेशनचे अध्यक्ष दीपक कणसे, सचिन काळे, उपाध्यक्ष मुबारक तांबोळी, किसन औटी, सचिव रामचंद्र हाडवळे, खजिनदार शांताराम हाडवळे, एम. डी. घंगाळे, एकनाथ शिंदे, सुदाम औटी, सतीश पा. औटी, बाळासाहेब हाडवळे, संतोषकुमार औटी, मंगेश वाघ, मिना कणसे अकबर पठाण, शाकीर चौगुले आदी मान्यवरांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. दरम्यान या संस्थेने विद्या विकास मंदीर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयासाठी पन्नास हजार रूपये तर गरीब विद्यार्थी प्रसाद हाडवळे याला शस्रक्रियेसाठी दहा हजार रूपये तर काही मुलांच्या शिक्षणाचा खर्च तसेच शाळा नं. 1साठी वॉटर प्युरीफायरसाठी 20 हजार रूपये व संपूर्ण शाळेसाठी 50 हजार रूपये खर्च केलेला आहे.

गव्हाळी शाळेसाठी सुशोभिकरणासाठी 40 हजार रूपयांची झाडे दिले. विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासासाठी आंतराष्ट्रीय दर्जाचा सेमीनार कार्यक्रम आयोजीत केला होता. त्यासाठी तीन लाख रूपये खर्च केले होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)