पुणे जिल्हा: योग्यवेळी मिळालेले करिअर मार्गदर्शन कलाटणी देते

आमदार बाबूराव पाचर्णे : कोरेगाव भीमा येथे करिअर मेळाव्याला प्रतिसाद

कोरेगाव भीमा – योग्य वेळी मिळालेले करिअर मार्गदर्शन आयुष्याला चांगली कलाटणी देऊ शकेल तसेच अनेकांच्या यशाचे शिल्पकारही ठरेल, असे प्रतिपादन आमदार बाबूराव पाचर्णे यांनी केले. येथील युनिव्हर्सल स्कूल आणि पाबळे ऍडच्या वतीनने दहावी-बारावी विद्यार्थी व पालकांसाठी “मोफत करिअर मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन केले होते. याचे उद्‌घाटन पाचर्णे यांच्या हस्ते करण्यात आले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

यावेळी व्यक्तिमत्व विकास तज्ञ वंदन नगरकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी विद्या शाखा, उपशाखांची माहिती दिली. पाबळे यांनी आयोजित केलेल्या या उपक्रमाचे आमदार पाचर्णे यांनी कौतुक केले.तर अनिल गुंजाळ म्हणाले, मुलांना टक्केवारीपेक्षा आवडीच्या क्षेत्रात करिअरसाठी पालकांनी पाठबळ द्यावे. मोठ्यांची चरित्रे वाचा. मात्र, भ्रष्टआचार, अंधश्रध्दा, जातीयता, व्यसनाधिनता आणि आत्महत्या करु नका. तर वंदन नगरकर म्हणाले, विद्यार्थी व पालकांना प्रत्येकातील कलागुणानुसार करीअरचे विविध मार्ग सांगितले.

यावेळी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीप कंद यांनीही करीअर मार्गदर्शन ही महत्वाची बाब असल्याचे असून विद्यार्थी यांच्या हिताकरीता मोठ्या प्रमाणावर हा उपक्रम राबविणार आहे. त्यांनतर नारायणराव फडतरे यांनीही मार्गदर्शन केले. पत्रकार शरद पाबळे आणि वैशाली पाबळे यांचा सत्कार केला. यावेळी युनिव्हर्सलच्या दहावीतील गुणवंत विद्यार्थांचा सत्कार करण्यात आला.
युनिव्हर्सलचे संचालक दत्तात्रय राजेशिर्के आणि नीता राजेशिर्के यांनी स्वागत केले. मधुकर कंद आणि श्वेता काळुराम गव्हाणे यांनी सूत्रसंचालन केले. तर शरद पाबळे यांनी आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)