पुणे जिल्हा: मेट्रोचा विस्तार राजगुरुनगरपर्यंत करा

चाकण -बहुचर्चित मेट्रो विस्ताराच्या पुढील टप्प्यात नाशिक फाट्यापासून मोशी-चाकण मार्गे राजगुरुनगरपर्यंत मेट्रो करावी, अशी मागणी खेडचे आमदर सुरेश गोरेंनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून केली आहे.

औद्योगिक नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चाकण शहर व परिसरात मोठ मोठे उद्योगधंदे उभे आहेत. यामध्ये प्रामुख्याने महिंद्रा, बजाज, मर्सिडिज बेंझ, फोक्‍स वॅगन, जनरल इलेक्‍ट्रिक, यांसारख्या मोठ्या राष्ट्रीय व बहुराष्ट्रीय कंपन्यांचा समावेश आहे. या ठिकाणी कामासाठी पिंपरी चिंचवड व पुण्यातुन येणाऱ्या कामगारांची संख्या अधिक आहे. चाकण एमआयडीसीला पुणे व पिंपरी चिंचवड शहरासोबत मेट्रोने जोडल्यास दळणवळणामधे मोठी क्रांती होईल व हा प्रकल्प आर्थिकदृष्ट्याही नक्कीच फायदेशीर ठरेल. केंद्र शासनाने नुकतीच नाशिक फाटा ते राजगुरुनगर राष्ट्रीय महामार्ग सहापदरी करण्यासही मान्यता दिली आहे. सहापदरी महामार्गाचे काम चालू करण्यासोबतच मेट्रोचेही काम सोबत करण्यास मंजुरी दिल्यास दोन्ही कामे एकत्र होऊन शासनाचा वेळ आणि पैसा वाचू शकेल व दळण वळणाचा वेग वाढून परिसराच्या विकासाचा वेग वाढेल. म्हणून मेट्रो विस्ताराच्या पुढील टप्प्यामध्ये नाशिकफाटा ते मोशी, चाकण व पुढे राजगुरुनगरपर्यंत मेट्रो विस्तार करावा अशी मागणी आमदार सुरेश गोरेंनी केली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)