पुणे जिल्हा: मार्च संपला तरी तूरडाळ मिळेना

...तर कारवाई करू -तहसीलदार सबनिस
याबाबत तहसीलदार रवींद्र सबनीस यांच्याकडे संपर्क साधला असता ते म्हणाले की, आवश्‍यक ती माहिती घेऊन दोषी असेल तर संबंधित दुकानदारावर कारवाई केली जाईल.

आंबेगावातील स्वस्त धान्य दुकानदारांची चौकशी करण्याची मागणी

मंचर -मार्च महिना संपत आला तरी काही स्वस्त धान्य दुकानात ग्राहकांना अद्याप तरी तूरडाळ मिळाली नसल्याने संबंधित दुकानदारांनी तूरडाळीचा काळाबाजार करून विक्री केली असावी. याची वरिष्ठ अधिकाऱ्यांनी चौकशी करावी, अशी मागणी रेशनकार्डधारक करत आहेत.

राज्यात मागील वर्षी तुरीचे उच्चांकी उत्पादन झाल्याने सरकारने शेतकऱ्यांची तूर खरेदी केली. परंतु गरजेपेक्षा जास्त तूर झाल्याने राज्य शासनाने स्वस्त धान्य दुकानात तूरडाळ विक्री करण्याचा निर्णय घेतला. त्याची अंमलबजावणी दोन महिन्यांपासून सुरू झाली. आंबेगाव तालुक्‍यातील स्वस्त धान्य दुकानात तूरडाळ विक्री चालू होऊन 55 रुपये किलो अल्पदराने एका रेशनकार्ड धारकाला एक किलो तूरडाळ दिली जाते. परंतु मार्च महिन्यात तालुक्‍यातील काही स्वस्त धान्य दुकानात तूरडाळ अद्याप विक्रीसाठी उपलब्ध झाली नाही. त्यामुळे संबंधित दुकानदाराने तुरडाळ विक्रीसाठी आणली नाही किंवा तूरडाळ काळाबाजाराने विक्री केली जाते. याची वरिष्ठ पातळीवर चौकशी करावी, अशी मागणी रेशन कार्डधारक करीत आहेत. त्याचप्रमाणे तालुक्‍यात एकाच महिला बचत गटाला तीन ते चार स्वस्त धान्य दुकान चालवण्याचा परवाना दिला असल्याने महिला बचत गटाच्या स्वस्त धान्य दुकानांमधील स्वस्त धान्य वेळेत मिळत नसल्याची चर्चा तालुक्‍यात सुरू आहे. रेशनकार्डधारकांना धान्य घेतल्याची पावती मिळत नाही. अशा महिला बचत गटांना एकाच दुकानाचा परवाना द्यावा किंवा ग्राहकांना वेळेत धान्य न देणाऱ्या महिला बचत गटांचा परवाना रद्द करण्यात यावा, अशी मागणी रेशनकार्ड धारक करत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)