पुणे जिल्हा: भवरापूर वाळू चोरीचे रॅकेट उघड

“प्रभात’च्या बातमीचा प्रभाव
हवेली तालुक्‍यातील वादग्रस्त अशा या प्रकरणात पोलीस पाटील चंद्रकांत टिळेकर यांनी त्यांच्या ताब्यातील सहा वाहनांपैकी 5 वाहने “दैनिक प्रभात’च्या बातमीमुळे जमा केली आहेत. यापैकी एक वाहन अजूनही जमा केले नाही. याबाबत अप्पर पोलीस अधीक्षक संदीप पखाले यांनी सांगितले की, महसूल विभागाकडून या प्रकरणी योग्य ती कारवाई,तसेच पोलीस विभागाकडूनही योग्य ती कारवाई लवकरच करण्यात येईल, असे सांगितले.

3 आरोपींना 22 मार्चपर्यंत पोलीस कोठडी

वाघोली – भवरापूर (ता. हवेली) येथील बेकायदा वाळू उत्खनन प्रकरणी उरुळी कांचनचे मंडल अधिकारी किशोर शिंगोटे यांनी फिर्याद दिली होती. त्यानुसार भरत पवार, धनंजय टिळेकर, कैलास साठे या तिघांना अटक करून आज (दि. 20) तपास अधिकारी महेंद्र चांदणे यांनी न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने गुरुवारपर्यंत (दि. 22) पोलीस कोठडी सुनावल्याची माहिती तपास अधिकारी महेंद्र चांदणे यांनी दिली आहे.

या प्रकरणात मोठ्या प्रमाणात पहिल्यांदाच वाळू चोरीचे रॅकेट उघड झाले असून, पोलिसांकडून सध्या योग्य दिशेने तपास चालू आहे. या वाळू चोरांनी वाळू उपसा करून वाळू कोणाला विकली, चोरीची वाळू कोणी विकत घेतली, वाळू चोरीला कोणत्या अधिकाऱ्याचे पाठबळ होते, वाळू चोरीसाठी वापरण्यात आलेल्या वाहनांचे चालक कोण होते, वाळू चोरांनी वाळू यापूर्वी कोठे अशाच प्रकारे चोरली होती का, या आणि अशाच अनेक प्रश्नांची उत्तरे पोलीस तपासातून उघड होणार आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)