पुणे जिल्हा बार असो. निवडणूक कार्यक्रम जाहीर

– दि. 31 जानेवारी रोजी होणार मतदान, मतमोजणी
– ऍड. बिपीन पाटोळे असतील मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी

पुणे – जिल्ह्यातील वकिलांची शिखर संघटना असलेल्या पुणे जिल्हा बार असोसिएशनचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. 31 जानेवारी रोजी मतदान होणार असून, त्याच दिवशी रात्री निकाल जाहीर होणार आहे. या निवडणुकीसाठी मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून पुणे जिल्हा बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष ऍड. बिपीन पाटोळे यांची, तर उपमुख्य निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ऍड. पांडुरंग थोरवे आणि ऍड. विजयसिंह निकम यांची निवड झाली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

दि. 9 जानेवारी रोजी सकाळी 11 ते सायंकाळी 5 या वेळेत शिवाजीनगर न्यायालयातील पुणे जिल्हा बार असोसिएशनच्या कार्यालयात उमेदवारी नामांकन अर्जाची विक्री होणार आहे. दि.11 जानेवारी रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत अर्ज भरता येणार आहेत. दि.14 जानेवारी रोजी अर्जांची छाननी होणार आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत दि.16 जानेवारी रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत आहे. दि.17 जानेवारी रोजी बार असोसिएशनच्या कार्यालयात उमेदवारांची अंतिम यादी जाहीर होणार आहे.

दि.29 जानेवारी रोजी दुपारी 2 वाजता शिवाजीनगर न्यायालयातील अशोका हॉल येथे उमेदवारांचे मनोगत होणार आहे. दि.31 जानेवारी रोजी सकाळी 9 ते सायंकाळी 5.30 या वेळेत शिवाजीनगर न्यायालयात मतदान होणार आहे. सायंकाळी 6.30 नंतर मतमोजणीस सुरूवात होणार असल्याची माहिती पुणे जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष ऍड. सुभाष पवार यांनी दिली.

त्यावेळी उपाध्यक्ष ऍड. भूपेंद्र गोसावी, ऍड. रेखा करंडे-दांगट, सचिव ऍड. संतोष शितोळे, ऍड. लक्ष्मण घुले, हिशेब तपासणीस ऍड. सुदाम मुरकुटे, कार्यकारिणी सदस्य चेतन औरंगे, ऍड. लक्ष्मी माने, ऍड. प्रियदर्शनी परदेशी, ऍड. रमेश राठोड उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)