पुणे जिल्हा: बाजारभावाअभावी कोबी काढणी बंद

वाहतूक खर्चही परवडेना, दहा किलोला 20 ते 25 रूपये दर

मंचर -कोबी पिकाचे बाजारभाव गडगडल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत आले आहे. कोबी काढण्यासाठी मजूर आणि वाहतूक खर्चही परवडत नसल्याने शेतकऱ्यांनी कोबी काढणीच बंद केली आहे. कोबी पिकाला ग्राहकाकडून मागणी नसल्याने आणि कोबीचे मोठ्या प्रमाणात उत्पादन होत असल्याने बाजारभाव घसरले आहे, असे व्यापाऱ्यांनी सांगितले.

-Ads-

आंबेगाव तालुक्‍यात सुमारे 222 एकर क्षेत्रावर शेतकऱ्यांनी उन्हाळी कोबीचे पिक घेतले आहे. साधारण 60 ते 70 दिवसांत कोबी विक्री योग्य तयार होते. कोबी रोपे, खते, औषधे, मजुरी असा एकूण एक एकरसाठी 30 ते 40 हजार रूपये खर्च येतो. सध्या मिळणारा बाजारभाव पाहाता कोबी पीक पूर्णतः अंगावर आले आहे. कोबी काढणी आणि बाजारपेठेत पाठवणे शेतकऱ्यांना परवडत नाही. त्यामुळे कोबी पीक न काढलेले बरे, असे म्हणुन शेतकरी बाजारभाव अभावी दुर्लक्ष करत आहे. गेल्या दोन तीन वर्षात उन्हाळी हंगामात कोबीला दहा किलोसाठी 70 ते 80 रूपये बाजारभाव होता. त्या तुलनेत यंदाच्या हंगामात कोबीचे बाजारभाव प्रचंड गडलेले आहे. गेल्या आठवड्यात कोबीला दहा किलोस दहा ते पंचवीस रुपये बाजारभाव मिळत होता. परंतु सद्यस्थितीत दहा किलोला 20 ते 25 रूपये बाजारभाव मिळत आहे.कोबीला मिळणारा बाजारभाव पाहाता कोबी पीक आर्थिक अडचणीत आणणारे शेतकऱ्यांना ठरले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)