पुणे जिल्हा: बाजरी फुलोऱ्यात आल्याने फिरतेय गोफण

लाखणगाव -आंबेगाव तालुक्‍याच्या पूर्व भागातील पोंदेवाडी, लाखणगाव, देवगाव, काठापूर परिसरात उन्हाळी बाजरीचे पिक फुलोऱ्यात आले आहे. पाखरांपासून रक्षण होण्यासाठी शेतकरी बाजरी पिकाची राखण करण्यासाठी गोफण फिरत असल्याचे पहावयास मिळत आहे. आंबेगाव तालुक्‍याचा काही भाग घोडनदीच्या पाण्यामुळे सुजलाम सुफलाम झाला आहे. सध्या उन्हाळी बाजरी फुलोऱ्यात आली असल्यामुळे पाखरांचा मोठ्या प्रमाणावर बाजरी पिकाला त्रास होत आहे.पाखरांपासून रक्षण करण्यासाठी शेतकरी बाजरी पिकाची राखण करताना पहावयास मिळत आहे. पावसाळी हंगामात बाजरी उत्पादनापेक्षा जास्त उत्पादन उन्हाळी बाजरीमुळे मिळत आहे. तसेच बाजरीचे वैरणीचा उपयोग जनावरांना चारा म्हणूनही केला जातो. त्यासाठी चमकीचे पट्टे व विविध आवाज काढून शेतकरी बाजरी पिकाचे राखण करण्यासाठी पक्षांना हुसकावून लावत आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
3 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)