पुणे जिल्हा: बागेला नेसवल्या साड्या

संग्रहित फोटो

किड्यांपासूनही रक्षण…
देशाचे रक्षण करण्यासाठी प्रमाणीकपणे सैन्य दलात सेवा करून माजी सैनिक म्हणून ओळखले जाणारे शेतकरी राजेंद्र चव्हाण, मुळात शेती कमी असताना देखील नवनविन प्रयोग शेतीत यशस्वी करून भरघोस उत्पन्न मिळवतात. पपई फळाला रस सोसणारे किडे, या कालावधीत त्रास देतात म्हणून फळांना गुंडाळलेल्या साड्यांमुळे अशा किड्यांपासूनही बागेचे रक्षण होत आहे.

फळांच्या रक्षणासाठी शहाजीनगरच्या शेतकऱ्याचा उपाय

रेडा – पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात तापमानाने 40 अंश सेल्सीअसचा आकडा ओलांडल्याने उन्हाचे चटके, झळांमुळे जनजीवन विस्कळीत होत असताना याचा फटका जनावरांसह फळाबागांनाही बसू लागला आहे. यातून फळं खराब होवून आर्थिक फटका बसू नये याकरिता रेडा (शहाजीनगर) येथील बागायतदार राजेंद्र राघू चव्हाण यांनी पपई बागेला थेट नव्या साड्या गुंडाळून फळांचे रक्षण करण्याचा प्रयत्न केला आहे.

राज्यभरात पारा 40च्या वर गेला आहे. जिल्ह्यासह इंदापूर तालुक्‍यातही उन्हाच्या झळा जाणवू लागल्या आहेत. फळांचे उन्हापासून संरक्षण करावे, यासाठी शहाजीनगर (ता. इंदापूर) येथील राजेंद्र चव्हाण या शेतकऱ्याने अर्धा एकर पपई बागे भोवती पूर्णपणे साड्या गुंडाळल्या आहेत. पपई बागेचे उन्हापासून संरक्षण करण्याकरिता अनोखा उपाय शोधल्याचे चव्हाण यांनी सांगितले .

सध्या, पपई पीक जोमात आले आहे. परंतु, कडक उन्हामुळे विहीर व बोअरचे पाणी वेगाने कमी होवू लागले आहे. कडक ऊन आणि कमी पाणी यात फळ बागेची निगा कशी राखावी, याच अडचणीवर मात करीत फळ खराब होवू नयेत. यासाठी बागचव साड्यांनी झाकायची, अशी कल्पना सुचल्याने हा उपक्रम राबविल्याचे चव्हाण यांनी सांगितले. अर्धा एकर लावलेल्या पपईचे पीक जगवण्यात यश आले असून फळ आता चांगले लगडले आहे. महागड्या उपयांपेक्षा अशा प्रकारच्या कमी खर्चातही पीक, फळबागांचे रक्षण करता येवू शकते, असेही चव्हाण यांनी सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)