पुणे जिल्हा: बळीराजाला वांगी करणार मालामाल!

सोमेश्‍वर परिसरात दमदार पीक : चांगला भाव मिळण्याची अशा

करंजे – सोमेश्‍वर (ता. बारामती) परिसरात सध्या मुबलक पाणी उपलब्ध असल्यामुळे काही शेतकऱ्यांनी अजयंकूर या जातींचे वांग्याचे पीक घेतले असून चांगला बाजारभाव मिळण्याची बळीराजाला अपेक्षा आहे.

सोमेश्‍वरनगर मधील परिसर ऊस उत्पादक म्हणून ओळखत असतानासुद्धा नागरिक तरकारी पिकांकडे वळाले आहेत. बऱ्याच शेतकऱ्यांनी वांग्याच्या पिकांमध्ये अजयंकुर या जातीचे पीक घेतले आहे. फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात लावलेले वांग्याचे झाड मे, जून महिन्यात चांगल्या भावाने विकून नफा मिळतो अशी अशी जीरायती भागातील शेतकऱ्यांचा अंदाज आहे. सध्या वांगी बाजारात विक्रीसाठी आठवडे बाजार जाण्याची शक्‍यता असून किमान तीनशे रुपय कॅरेटच्या स्वरूपात बाजाभाव असल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्‍त केले आहे.

वांगी लागवडीसाठी लागणार खर्च हा एकरी साधारण 20 ते 25 हजार रुपये येतो. असे मत परिसरती दरवर्षी वांग्याचे पीक घेण्यासाठी सुरवातीला शेतामध्ये नांगरणी, बांधणी, खते,लागणारी रोपे लागवड, त्याला लागणारी औषध फवारणी वाहतूक खर्च यासाठी एकरी 20 ते 25 हजारांपेक्षाही अधिक खर्च येतो, अशी माहिती वांग्याचे पीक घेणारे शेतकरी बाबुराव गायकवाड,अतुल रासकर, सागर खोपडे,सतीश तांबे,गुलाब रिठे यांनी दिली.
सोमेश्‍वरनगर (ता. बारामती) ; बाबूराव गायकवाड यांचा शेतातील वांग्याचे पीक तोडणीस आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)