पुणे जिल्हा: बनावट मद्य विकणारी टोळी जेरबंद

भिगवण – जिल्ह्यात अवैध धंद्यांवर धाडसत्र सुरू असून यानुसार मध्य प्ररदेशातून मद्य आणून ते मोकळ्या बाटल्यांत भरून त्याची विक्री महाराष्ट्रात करणारी टोळी राज्य उत्पादन शुल्क विभागाने जेरबंद केली. इंदापुर तालुक्‍यातील ढाब्यांवर अशा प्रकारच्या मद्याची विक्री या टोळीकडून होत होती. यातून बनावट मद्य विक्रीचे मोठे चॅनेल उघड होण्याची शक्‍यता व्यक्त केली जात आहे.

निमगाव केतकी ते पोंदकुलेवाडी रस्त्यावरील ढाब्यावर अवैध व बनावट दारू विक्री होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर राज्य उत्पादन शुल्कच्या दौंड विभागाकडून ढाब्यावर धाड टाकून बनावट व परराज्यातील मद्य विक्री करणाऱ्या टोळीला पकडण्यात आले, त्यांच्याकडून 1,62,680 रुपये किमंतीचा माल जप्त करण्यात आला असून महादेव तुकाराम ठोंबरे (वय 26), नितीन रामदास वाघमोडे (वय 29, दोघे रा. नातेपुते, ता. माळशिरस) या दोघांना अटक करण्यात आली आहे. आरोपींना तीन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.

इंदापूर तालुक्‍यांतील ढाब्यांवर बनावट मद्याची विक्री होत असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे वारंवार येत होत्या. मध्यप्रदेशातील मद्द विक्रीस आणून ते महाराष्ट्राच्या रिकाम्या बाटल्यात भरून विक्री होत असल्याचेही अनेकदा आढळून आले होते. यामुळे पुणे-सोलापूर महामार्गा पेक्षा अंतर्गत रस्त्यांवर राज्य उत्पादन शुल्कच्या अधिकाऱ्यांनी नजर ठेवली होती. यानुसार निमगाव केतकी ते पोंदकुलेवाडी रस्त्यावरील ढाब्यावर मध्यप्रदेश निर्मित विदेशी मद्याची विक्री होत असल्याचे उघड झाल्याने राज्य उत्पादन शुल्क विभागाने ही संधी साधत कारवाई केली. गुरूवारी (दि.22) टाकलेल्या धाडीत मारुती कंपनीचे वाहन (क्र.एमएच 01 डीअे 5494), मॅकडॉल कंपनीच्या व्हिस्कीच्या 180 मिलीच्या 48 बाटल्या, इंम्पोरीयल व्हिस्कीच्या 48 बाटल्या, ऑफीसर चॉईस 48 बाटल्या, असा माल जप्त करण्यात आला. ज्यावेळी धाड टाकण्यात आली, त्यावेळी या टोळीकडे महाराष्ट्रात उत्पादीत होणाऱ्या मद्याच्या 687 रिकाम्या बाटल्या व 1000 पेक्षा अधिक बुचणे सापडली. बनावट दारू तयार करण्यासाठी वापरण्यात येणारे कॅरॅमल 1.5 लिटर आढळून आले आहे.

मा. विभागीय उपआयुक्त राज्य उत्पादन शुल्क, पुणे अर्जुन ओहोळ तसेच अधिक्षक राज्य उत्पादन शुल्क, पुणे व उप अधीक्षक, पुणे प्रवीण तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली दौंड विभागाचे निरीक्षक एम. एन. कावळे, उपनिरीक्षक श्रीमती एस. एन. लांडगे, उपनिरीक्षक आर. आर. साळोखे, सहाय्यक दुय्यम निरीक्षक जी. एम. नीळ, व्ही. व्ही. विंचूरकर, ए. झेड. कांबळे, ए. दी. म्हेत्रे, महिला जवान ए. ए. घोडके यांच्या पथकाने ही कारवाई केली असून अधिक तपास उपनिरीक्षक श्रीमती एस. एन. लांडगे करीत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)