पुणे जिल्हा: फर्निचरचे दुकान आगीत खाक

इंदापूर – इंदापूर नगरपालिकेच्या हद्दीतील भार्गवराम तलावा शेजारील वेल्डिंग वर्क्‍सच्या दुकान लाईनमध्ये सकाळी 11च्या सुमारास आग लागली. त्या आगीमध्ये दुकानातील लाकडी दरवाजे, दुकानातील साहित्य असे अंदाजे एकूण दोन लाख रुपयांचा मुद्देमाल जळून खाक झाला. आग लागण्याचे कारण अद्याप समजू शकले नाही.

आग लागल्याचे शेजारी असणाऱ्या दुकानदार यांना समजल्याने त्यांनी नगरसेवक भरत शहा यांना कळवले. इंदापूर नगरपालिकेची अग्निशमनची गाडी नसल्याचे भरत शहा यांना माहिती असल्याने शहा यांनी बिजवडी येथील कर्मयोगी साखर कारखाना व रेडा येथील निरा भिमा साखर कारखान्याच्या अग्निशमन विभागाशी संपर्क साधल्यानंतर 30 मिनिटांनंतर त्याठिकाणी अग्निशमन दल केवळ चालकासह घटनास्थळी पोहचले. आग लागलेली समजताच भरत शहा, गटनेते कैलास कदम, माऊली वाघमोडे यांनी घटनास्थळी धाव घेऊन माहिती घेतली. पोलिसांना खबर मिळताच त्याठिकाणी पोलीस निरीक्षक ननावरे, विनोद पवार यांनी पाहणी केली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)