पुणे जिल्हा: पोलीस पाटील झोपा काढतात?

उत्पादन शुल्कच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली शंका

वाघोली – हवेली तालुक्‍यातील गावोगावचे पोलीस पाटील झोपा काढतात की काय, अशी शंका राज्य उत्पादन शुल्क विभागातील अधिकारी व्यक्त करीत आहेत. तालुक्‍याच्या पूर्व भागातील गावांतील दारूभट्यांसारखे अनधिकृत धंदे तसेच मृतदेह सापडणे आदी गुन्ह्यांबाबत स्थानिक पोलीसांना वेळेवर माहिती मिळत नसल्याने कारवाई करण्यात अडचणी येत आहेत. उत्पादन शुल्क विभागाने कारवाई केल्यानंतर पोलीस यंत्रणेला पळापळ करावी लागत आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, पूर्व हवेतील गावच्या पोलीस पाटीलांकडून पोलीस तसेच महसूल विभागास माहिती देण्यात टाळाटाळ होत आहे. गावांच्या हद्दीचे कारण सांगत एकमेकांकडून लपवाछपवी करण्याचे प्रकार उघडकीस आले आहेत. अखेर राज्य उत्पादन शुल्क विभागाने काही ठिकाणच्या दारूभट्ट्या उध्वस्त केल्यानंतर पोलीस पाटील जागे झाले आहेत. उत्पादन शुल्क विभागाने भवरापुरच्या टिळेकरवस्तीवरील दारूची हातभट्टीवर कारवाई केल्यानंतर पोलिसांना माहिती मिळाल्याने नामुष्की ओढावली. तसेच काही दिवसांपूर्वी आढळून आलेल्या मृतदेहाबाबतही पोलीस पाटीलाने उशीरा माहिती दिल्याने पोलीसांची पंचाईत झाली होती, असे सहायक पोलिस निरीक्षक श्रीकांत इंगवले यांनी सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)