पुणे जिल्हा: पोलीस पाटलाच्या पत्नीचा खून

साकोरीतील घटना : चुलत पुतण्याचा आत्महत्येचा प्रयत्न
शारिरीक संबंधास नकार दिल्याने घटली घटना

मंचर/बेल्हे – शारीरिक संबंध ठेवण्यास चुलत काकुने विरोध दर्शविल्याने चिडलेल्या पुतण्याने काकुचा खून केला. त्यानंतर स्वत: विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना साकोरी (ता. जुन्नर) येथे आज (बुधवारी) पहाटे घडली. दरम्यान, मृत महिला पोलीस पाटलाची पत्नी असून या घटनेने साकोरी-बेल्हा परिसरात खळबळ उडाली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

संगीता देविदास साळवे (वय 50) असे मृत पोलीस पाटलाच्या पत्नीचे नाव आहे. तर शिवजी गेणू सावळे (वय. 45) असे आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या पुतण्याचे नाव असून त्याच्यावर पुण्यात उपचार सुरू आहेत. तर पोलीस पाटील देविदास खंडु साळवे यांनी मंचर (ता. आंबेगाव) पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, आज पहाटे पावणेपाचच्या सुमारास साळवे यांच्या घराच्या बाहेर आरडाओरडा होत असल्याचा आवाज आला म्हणून देविदास साळवे यांनी बाहेर येऊन पाहिले असता त्यांची पत्नी संगीता यांना पुतण्या शिवाजी साळवे हत्याराने मारत होता म्हणून संगीता या ओरडत होती. त्यावेळी देवीदास यांचा मुलगा राहुल आणि मुलगी त्रिवेणी हे घराच्या बाहेर आले व त्यांनी शिवाजी यास पकडण्याचा प्रयत्न केला; परंतु तो अंधाराचा फायदा घेऊन फरार झाला. यावेळी संगिता यांनी देविदास साळवे यांना सांगितले की, शिवाजी साळवे हा शारीरिक सुखाची मागणी करीत होता, त्यास विरोध केला म्हणून त्याने मला चिडून जाऊन हत्याराने मारले. गंभीर जखमी झालेल्या संगीता यांना प्रथम आळेफाटा येथील रुग्णालयात नेले असता तिथे डॉक्‍टरांनी नारायणगाव येथे नेण्यास सांगितले. नारायणगाव येथे नेल्यावर तेथील डॉक्‍टरांनी मंचर येथील ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयात नेण्यास सांगितले. मात्र, मंचर येथे संगीतास आणले असता उपचारापूर्वीच त्यांचा मृत्य झाल्याचे डॉक्‍टरांनी सांगितले.

त्यानंतर मंचर पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर पोलिसांनी या घटनेचा पंचनामा केला असून पुढील तपासासाठी हा गुन्हा आळेफाटा पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला आहे. दरम्यान मंचर उपजिल्हा रुग्णालयात मयत झालेल्या संगीता साळवे हिच्या मृतदेहाची आळेफाटा पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्योती डमाळे यांनी पाहणी केली. दरम्यान, गावालगतच असलेल्या कुकडी नदीच्या पात्रात शिवाजी साळवे हा बेशुद्ध अवस्थेत ग्रामस्थांना आढळून आला. त्याला ग्रामस्थांनी उचलून उपचारासाठी आळेफाटा येथे खासगी रुग्णालयात दाखल केले, त्याच्यावर प्राथमिक उपचार करून त्यास मंचर येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले तिथून त्याला पुण्यातील रुग्णालयात पुढील उपचारांसाठी रवाना करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)