पुणे जिल्हा: पुजाऱ्याच्या तोंडावर चादर टाकून मंदिरात चोरी

शिरूर तालुक्‍यातील खैरेनगर येथील घटना

शिक्रापूर – खैरेनगर (ता. शिरूर) येथील श्रीराम मंदिरात पुजारी पूजा करत असताना पुजाऱ्याच्या तोंडावर चादर टाकून अज्ञात चोरट्यांनी मंदिरातील एम्प्लीफायर मशीन चोरून नेल्याची घटना मंगळवारी (दि.26) घडली आहे. याबाबत शिवाजी ज्ञानोबा खैरे (रा. खैरेनगर पाचपीरवस्ती, ता. शिरूर, जि. पुणे) यांनी शुक्रवारी (दि.29) शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली आहे. त्यानुसार शिक्रापूर पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, खैरेनगर येथील श्रीराम मंदिरातील पुजारी निवृत्ती धुमाळ हे मंगळवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास मंदिरात पूजा करत असताना दोन अज्ञात लोक मंदिरात आले. त्यांनी धुमाळ यांच्या तोंडावर चादर टाकून मंदिरातील एम्प्लीफायर मशीन चोरून पळाले.
यावेळी धुमाळ यांनी बाहेर येऊन पहिले असता दोन अज्ञात लोक त्यांच्याजवळील दुचाकीवरून ती मशीन घेऊन कान्हूर मेसाई बाजूने बाजूने पळून गेले. त्यांनतर धुमाळ यांनी मंदिरात घडलेल्या चोरीबाबत राजेंद्र खैरे, रघुनाथ खैरे, सुदाम खैरे, रघुनाथ शिंदे, शिवाजी खैरे यांसह आदी ग्रामस्थांना कळविले. त्यानंतर ग्रामस्थांनी आजूबाजूला शोध घेतला. परंतु अज्ञात दुचाकीहून आलेले चोरटे सापडू शकले नाहीत. याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ दिवटे हे करीत आहेत.

दोन महिन्यात मंदिरात चोरीच्या तीन घटना
शिक्रापूर (ता. शिरूर) पोलीस स्टेशन हद्दीमध्ये 29 एप्रिल रोजी मुखई येथील भैरवनाथ मंदिरातील देवाचे लाखो रुपयांचे सोने, चांदीचे दागिने चोरी गेले आहेत. त्यानंतर कान्हूर मेसाई येथील मंदिरातील दानपेटी 19 जून रोजी पळविल्याची घटना घडली आहे. दोन महिन्यांत मंदिरातील चोरीच्या दोन्ही घटना घडून देखील कोणत्याही मंदिरातील चोरीचा गुन्हा अद्याप उघड झालेला नसताना देखील पुन्हा मंदिरामध्ये चोरी झाल्याची घटना घडल्याने अनेक ठिकाणचे ग्रामस्थ भयभीत झाले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)